कोंझर गावातील मोबाइल टाॅवरला ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 11:55 PM2021-01-10T23:55:11+5:302021-01-10T23:55:41+5:30

टाॅवर स्थलांतर करण्यास प्रशासनाची टाळाटाळ; जिल्हा परिषदेकडे केला पत्रव्यवहार

Villagers protest against mobile tower in Konjar village | कोंझर गावातील मोबाइल टाॅवरला ग्रामस्थांचा विरोध

कोंझर गावातील मोबाइल टाॅवरला ग्रामस्थांचा विरोध

googlenewsNext

दासगाव : किल्ले रायगड परिसरातील कोंझर गावात जिओ कंपनीद्वारे मोबाइल टाॅवर उभा करण्यात आला आहे. हा टाॅवर गावापासून काही अंतर लांब उभा केला जावा, अशी मागणी ग्रामस्थांनी करत टाॅवर उभा करताना महसूल आणि ग्रामपंचायतीचे कायदे धाब्यावर बसवण्यात आल्याचे ग्रामस्थांनी माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीमधून समोर आले आहे. यामुळे महाड पंचायत समितीनेदेखील या टाॅवरबाबत कार्यवाही व्हावी याकरिता जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

महाड तालुक्यात एका खासगी कंपनीद्वारे मोबाइल टाॅवर उभे करण्याचा धूमधडाका सुरू करण्यात आला आहे. या कंपनीला केंद्र शासनाचा वरदहस्त असल्याने स्थानिक प्रशासन टाॅवर उभे करताना लागणाऱ्या निकषांकडे दुर्लक्ष करत आहे. अशाच प्रकारे किल्ले रायगड परिसरातील कोंझर गावात भरवस्तीत मोबाइल टाॅवर उभा करण्यात आला आहे. मात्र या टाॅवरला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत महाड पंचायत समिती आणि महाड महसूल विभागाला टाॅवर गावापासून लांब उभा केला जावा यासाठी तक्रारीवजा मागणी केली आहे. 

या तक्रारीत स्थानिक ग्रामस्थ विजय कदम यांनी टाॅवरची मागणी केलेल्या अर्जाची संपूर्ण माहिती ग्रामसेवकांकडून मागून घेतली असता या मागणी अर्जाला जोडण्यात आलेल्या सातबारामध्ये फरक असल्याचे तहसीलदार सुरेश काशीद यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र याबाबत आजतागायत कोणतीच कारवाई न करता महसूल प्रशासनाने विनापरवाना वाणिज्य वापर केल्याबाबत सुमारे ९३४९०ची दंडात्मक कारवाई ९ नोव्हेंबर २०२० रोजी केली आहे. आपण केवळ दंडात्मक कारवाई करू शकतो असे कारण पुढे करत तहसीलदार काशीद यांनी टाॅवर स्थलांतर मागणीकडे दुर्लक्ष केले 
आहे.       

कोंझर गावात उभ्या केलेल्या टाॅवरमुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांना धोका निर्माण झाला असून हा टाॅवर उभा करताना कोणतेच शासकीय नियम पाळलेले नाहीत. यामुळे हा टाॅवर गावापासून काही अंतरावर स्थलांतर करावा.
– विजय कदम, तक्रारदार

तत्कालीन सरपंचाने या मोबाइल टाॅवरला परवानगी दिलेली असून यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे, यामुळे टाॅवर स्थलांतर केला जावा.
– सुवर्णा राजू रेवणे, सरपंच, कोंझर

 

Web Title: Villagers protest against mobile tower in Konjar village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड