महाडमधील गावे, वाड्या सुन्यासुन्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 01:41 AM2020-04-28T01:41:47+5:302020-04-28T01:41:58+5:30
महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिक या सर्वांमुळे आजपर्यंत हे शक्य झाले आहे.
दासगाव : संपूर्ण जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. भारतात या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण भारतामध्ये लॉकडाउन आहे. कोरोनाची भीती आणि लॉकडाउनचे पालन करत संपूर्ण महाड तालुक्यातील गावे आणि खेडी सुनसान झाली आहेत. यामुळे महाडकरांना कोरोना या रोगावर मात करण्यास आज तरी यश आले आहे. यामध्ये महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिक या सर्वांमुळे आजपर्यंत हे शक्य झाले आहे.
रायगड जिल्ह्याशेजारी मुंबईतील दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यामध्येदेखील रुग्ण सापडले आहेत. याव्यतिरिक्त महाड तालुक्याशेजारी असलेल्या पोलादपूर तालुक्यामध्ये हे रुग्ण आढळले. असे असताना मात्र महाड तालुका या कोरोनापासून अद्याप तरी बचावला आहे. याचे महत्त्वाचे कारण शासनाने केलेल्या लॉकडाउनचे पालन. काही प्रमाणात शहर सोडले तर संपूर्ण महाड तालुक्यातील गाव आणि खेड्यांमध्ये पुरेपूर केले जात आहे. त्यामुळे गजबजलेल्या गावांमध्ये आज शुकशुकाट दिसून येत आहे.
सध्याच्या स्थितीत पुणे, मुंबई, राज्य, परराज्यातुन मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली. त्यामुळे १२,३५६ नागरिक हे संपूर्ण तालुक्यामध्ये आले आहेत. या नागरिकांची पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने नोंद करत या नागरिकांना होम क्वारंटाइन के ले, तर त्या त्या गावातील नागरिकांनी त्यांच्यावर कडक लक्ष ठेवत शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास भाग पाडले. यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवण्यास महाडकरांना यश आले आहे.
>प्रशासनाचे कौतुक : पोलीस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई के ली,तर अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानदारांना शिस्त लावली. आरोग्य विभागानेदेखील बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच योग्य सूचना दिल्या, तपासणी के ली. महसूल विभागाने कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत ग्रामीण भागात धान्यवाटप के ले. यामुळेच कोरोना महाडमध्ये संचार करू शकला नाही. या प्रशासकीय कामाचे नागरिकांकडून कौतुकच होत आहे.