स्वत:च्या पद्धतीनेच गावे
By admin | Published: November 29, 2014 12:34 AM2014-11-29T00:34:51+5:302014-11-29T00:34:51+5:30
प्रत्येकाने स्वत:च्या पद्धतीनेच गाणो गात राहावे. आपली शैली ओळखून त्यानुसार गाण्याचा सराव करावा, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी नवोदित गायकांना दिला.
Next
मुंबई: प्रत्येकाने स्वत:च्या पद्धतीनेच गाणो गात राहावे. आपली शैली ओळखून त्यानुसार गाण्याचा सराव करावा, असा मोलाचा सल्ला ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी नवोदित गायकांना दिला. महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाकडून ‘गानसम्राज्ञी
लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांना प्रदान करण्यात आला, त्या सोहळ्य़ात ते बोलत
होते.
प्रभादेवी येथील रवींद्रनाटय़ मंदिर येथे हा पुरस्कार सोहळा रंगला. लता आणि आशा या एकाच घराण्यात जन्मलेल्या गायिकांनी स्वत:च्या वेगवेगळ्या शैलीत गाण्याला सुरुवात केली. या दोघी बहिणींचे प्रातिनिधीक स्वरुप म्हणजे कृष्णा कल्ले, असे गौरवोद्गार देव यांनी यावेळी काढले. ‘पाश्र्वगायन क्षेत्रतील माझा संबंध तुटला असला तरी या पुरस्कारामुळे तो पुन्हा जोडला गेला. मी अमराठी असूनही यशवंत देव यांनी मला मराठीत गाण्याची संधी दिली. याबद्दल मी त्यांची ऋणी आहे, अशा शब्दांत कल्ले यांनी भावना व्यक्त केल्या.
कल्ले यांच्या नावाची निवड सुलोचना चव्हाण, रवींद्र साठे, रवींद्र जैन व अरुण दाते यांच्या निवड समितीने केली. कृष्णा यांच्या ‘परिकथेतील राजकुमारा..’ हे गाणो वैशाली माडेने सादर केलेल्या गीताने उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सुलोचना चव्हाण, रवींद्र साठे, रवींद्र जैन, अरुण दाते, पर्यटन व सांस्कृतिक कार्य, सचिस वल्सा नायर सिंह हे मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)