विराट कोहलीही बनला अलिबागकर; २,००० स्क्वेअर फुटांचा अद्ययावत बंगला खरेदी केला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 08:00 AM2023-02-24T08:00:41+5:302023-02-24T08:01:06+5:30
आवास लिव्हिंग अलिबाग एलएपी यांचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
अलिबाग - उद्योजक, राजकारणी, अभिनेते तसेच क्रिकेटर हे अलिबागच्या निसर्गाला मोहून अलिबागकर झाले आहेत. यात आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि जगविख्यात क्रिकेटर फलंदाज विराट कोहली याची भर पडली आहे. कोहलीने आवास लिव्हिंग अलिबाग एलएलपी या बंगलो प्रोजेक्टमध्ये ६ कोटींचा बंगला खरेदी केला आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने संबंधित खरेदी व्यवहार गुरुवारी २३ फेब्रुवारीला अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात विराटच्या वतीने पूर्ण केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित वाडेकर, इशांत पंत यांच्यासह विराट कोहलीदेखील अलिबागकर झाला आहे.
आवास लिव्हिंग अलिबाग एलएपी यांचे बंगलो प्रोजेक्ट आहेत. निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. अनेक कलाकार, क्रिकेटर या प्रकल्पात बंगलो खरेदी करीत आहेत. नुकतेच अभिनेते राम कपूर व गौतमी कपूर यांनीही या प्रकल्पात २ घरे खरेदी केली.
सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघामध्ये चालू असलेल्या टेस्ट मालिकेमुळे विराट स्वतः अलिबाग येथे उपस्थित राहू शकला नाही; परंतु विराटचा भाऊ विकास कोहली याने व्यवहार केला, अलिबागमध्ये गेल्या १७ वर्षे जमिनीविषयी कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत ॲड. महेश म्हात्रे यांनी याकामी सर्व कागदपत्रीय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
२,००० स्क्वेअर फुटांचा अद्ययावत बंगला
विराटने २ हजार स्क्वेअर चौरस मीटर बंगला खरेदी केला आहे. यामध्ये ४०० स्क्वेअर मीटर स्वीमिंग पूलही आहे. बंगल्यामध्ये अद्ययावत असे फर्निचर, सोयी-सुविधांनीयुक्त असे साहित्य आहे.