Virat Kohli: गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस

By राजेश भोस्तेकर | Published: September 1, 2022 06:24 PM2022-09-01T18:24:55+5:302022-09-01T18:52:39+5:30

Virat Kohli: अलिबाग हा मुंबईला लागून असलेला निसर्गाने नटलेला तालुका आहे.

Virat Kohli: On the occasion of Ganapati, 'Virat' Kherdi will build a farm house on 8 acres in Alibaug. | Virat Kohli: गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस

Virat Kohli: गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस

Next

अलिबाग (राजेश भोस्तेकर) : जग विख्यात क्रिकेटर सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, अजित आगरकर, रोहित शर्मा हे अलीबागच्या सौंदर्यात पडुन अलिबागकर झाले आहेत. या दिग्गजांसोबत आता विराट कोहली ही अलीबागच्या सौंदर्यात हुरळून गेला असून तो पण गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागकर झाला आहे. विराट कोहली याने झिराड येथे आठ एकर जागा घेतली असून त्याठिकाणी तो फार्म हाऊस बांधणार आहे. विराटचा भाऊ विकास कोहली याने हा व्यवहार गणपती आगमनाच्या आदल्या दिवशी मंगळवारी 30 ऑगस्ट रोजी पूर्ण केला आहे. 

अलिबाग हा मुंबईला लागून असलेला निसर्गाने नटलेला तालुका आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यात दिग्गज व्यक्ती आपले दुसरे घर, फार्म हाऊससाठी पसंती देत आहेत. क्रिकेटर, कलाकार, राजकीय नेते, उद्योजक हे अलिबागकर झाले आहेत. त्यामुळे अलिबाग हे दिग्गजांचे डेस्टिनेशन म्हणून उदयास येऊ लागले आहे. त्यात आता क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा याचीही भर पडली आहे.

सहा महिन्यांपूर्वी विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी झिराड येथे येऊन जागेची पाहणी केली होती. क्रिकेटच्या व्यस्त कार्यक्रमामुळे विराट कोहली यास अलिबागमध्ये येऊन जागेचा व्यवहार पूर्ण करता येत नव्हता. सध्या तो आशिया कप क्रिकेट स्पर्धेसाठी दुबईत आहे. त्यामुळे गणपतीचा आदल्या दिवसाचा मुहूर्त साधत लहान भाऊ विकास कोहली याने ‘पॉवर ऑफ अटर्नी’द्वारे विराट कोहलीसाठी व्यवहार पूर्ण केला. झिराड येथील 8 एकर जमीन खरेदी-विक्रीची कागदपत्रे अलिबाग येथील सह दुय्यम निबंधक अश्विनी भगत यांच्याकडे नोंदणीकृत केली. या जमिनीची एकूण किंमत 19 कोटी 24 लाख 50 हजार रुपये असून यासाठी त्याने 3 लाख 35 हजार रेडीरेकनरनुसार 1 कोटी 15 लाख 45 हजार रुपयांची स्टॅम्प ड्युटी सरकारच्या तिजोरीत जमा केली.  मंगळवारी विकास कोहलीने निबंधक कार्यालयात उपस्थित राहून हा व्यवहार रजिस्टर केला. हा व्यवहार रियल इस्टेटमधील नावाजलेल्या समिरा हॅबिटॅट्स या कंपनीने केला.

सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, रवी शास्त्री, रोहीत शर्मा यांच्या पाठोपाठ आता विराट कोहलीही अलिबागकर होणार आहे. उद्योजक, सिने कलाकारांबरोबरच क्रिकेटपटूंनाही अलिबागच्या निसर्गरम्य परिसराची भूरळ पडत आहे. रवी शास्त्री याने दहा वर्षांपूर्वीच अलिबागमध्ये घर बांधले आहे, तर म्हात्रोळी-सारळ परिसरात रोहीत शर्मा याच्या 3 एकरमधील फार्महाऊसचे काम चालू असल्याची माहिती या फार्महाऊसचे बांधकाम करणारे अमित नाईक यांनी दिली. याव्यतिरिक्त हार्दीक पंड्या, युजवेंदर चहल हेदेखील काही दिवसांपासून जागेचा शोध घेत अलिबागमध्ये पोहचले होते. यावरुन क्रिकेट, सिनेकलाकार, उद्योजकांची अलिबागला असणारी पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Virat Kohli: On the occasion of Ganapati, 'Virat' Kherdi will build a farm house on 8 acres in Alibaug.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.