खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:08 AM2020-06-12T00:08:10+5:302020-06-12T00:08:28+5:30

साडेतीन हजार नागरिकांना पोलीस अधीक्षकांची मदत : जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

The vision of humanity created by the khaki uniform | खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन

खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन

googlenewsNext

अलिबाग : खाकी वर्दी म्हटले की सामान्य नागरिक चार हात लांब राहतो. मात्र रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने खाकी वर्दीतला माणुसकीचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. वादळामुळे जिल्ह्यात बहुतांश भागांत नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपला संसार पुन्हा कसा उभा करायचा? या विवंचनेत असातानच रायगड पोलीस अधीक्षकांच्या मदतीने तीन हजार ६०० कुटुंबांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करून त्यांच्या चुली पुन्हा पेटवल्या आहेत.

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने रायगड जिल्हा पूर्ण विस्कळीत झाला. जिल्ह्याचे झालेले अतोनात नुकसान पाहता जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे. एवढेच नव्हेतर, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्नीने बचतीच्या पैशातून तातडीची मदत केली आहे. रायगड पोलिसांनी तीन हजार ६०० कुटुंबांना तर मोहिनी पारसकर यांनी १५० कुटुंबीयांना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पत्नी मोहिनी पारसकर आणि अपर पोलीस अधीक्षकांच्या पत्नी मनीषा गुंजाळ यांनी गृहिणींच्या समस्या जाणून त्यांना घरात लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा केला. यातून त्यांच्यामध्ये समाजाविषयी असलेली बांधिलकी समोर आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी नुकसानीचे चित्र आणि नागरिकांचे हाल जवळून बघितल्याने तत्काळ जेवण बनविण्यासाठी लागणाºया वस्तू पुरविण्यासाठी एनजीओच्या साहाय्याने मदतीचा हात पुढे केला आहे. जिल्हाभरातील विविध भागांत रायगड पोलिसांनी २ हजार ५०० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

घरावर संकट आले की गृहिणी कोलमडून जातात. त्यांची आर्थिक गणिते बिघडतात. त्यामुळे पुन्हा घर नव्याने कसे उभारायचे, हा प्रश्न त्यांना सतावत असतो. एक महिला म्हणून नुकसानग्रस्त महिलांच्या समस्या जाणून घेत त्यांना प्राथमिक अन्नधान्याची मदत पोहोचली पाहिजे म्हणून साठवणीचे पैसे रायगड पोलिसांकडे एक खारीचा वाटा म्हणून देऊ केले आहेत. यातून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. आमच्याकडून झालेल्या मदतीने आम्हाला समाधान मिळाले आहे.
- मोहिनी अनिल पारसकर, गावकरी

अलिबाग तालुक्याच्या किनारपट्टीवरील नागरिकांचे निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हे कळताच हातखर्चातून साठविलेले पैसे नुकसानग्रस्तांसाठी देऊन त्यांच्या घरतील चूल पेटणे महत्त्वाचे होते. आज आम्ही मदतीचा हात पुढे केल्यावर आणखी नागरिक मदतीसाठी पुढे येतील अशी अशा व्यक्त करीत नुकसानग्रस्तांना मदतीचा हात द्यावा.
- मनीषा सचिन गुंजाळ, गावकरी

Web Title: The vision of humanity created by the khaki uniform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.