छत्तीस देशांतील शासकीय अधिकाऱ्यांची जेएनपीटीला भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 03:09 AM2018-12-29T03:09:28+5:302018-12-29T03:28:23+5:30
भारतातील जेएनपीटी बंदराला मोठ्या संख्येने भेट देणाºया विदेशी शिष्टमंडळासाठी विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन जेएनपीटीने केले होते.
उरण : भारतातील जेएनपीटी बंदराला मोठ्या संख्येने भेट देणाºया विदेशी शिष्टमंडळासाठी विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन जेएनपीटीने केले होते. विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने आयटीईसीने ग्लोबल स्ट्रॅटेजिक ग्रोथ लीडरशीप व सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये ३६ देशातील ३८ शासकीय अधिकाºयांनी सहभाग नोंदवला.
या शिष्टमंडळामध्ये त्रिनिदाद व टोबॅको, क्युबा, इराक, श्रीलंका, नायजेरिया, कोलोम्बिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, जीनिया, पेरू, केनिया आणि व्हिएतनाम यांसारख्या देशातील प्रतिनिधी सहभागी झाले. जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल म्हणाले की, जागतिक कंटेनर कार्गो व्यवसायामध्ये जेएनपीटी लक्षणीय सहयोग नोंदवत असून, या प्रगतीसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. तसेच देशातील प्रमुख बंदरांपैकी ५३ टक्के कंटेनर कार्गो हाताळणी जेएनपीटीमधून केली जाते. जागतिक दृष्टिकोनातून जेएनपीटी पोर्टच्या कामकाजाची माहिती समजून घेण्यासाठी विविध देशांतील प्रतिनिधी एकत्र आले आहेत. अशा प्रकारचे सहकार्याचे प्रयत्न भारताला इतर जगाशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यास तसेच देशाच्या आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देतात.
या दौºयात शिष्टमंडळाने प्रथम बंदर परिसराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी जेएनपीटी व पोर्ट अँटवर्प यांच्या सयुंक्तरीत्या उभारण्यात आलेल्या एपेक ट्रेनिंग सेंटरला भेट दिली. जेएनपीटी अधिकारी व शिष्टमंडळ यांच्यात पोर्टच्या कामकाजाविषयी व विविध उपक्रमांविषयी सखोल चर्चा झाली. शिष्टमंडळाने जेएनपीटीचे एकंदर कामकाज तसेच खास करून इज आॅफ डुइंग बिजनेस उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या विविध प्रकल्पांचे अवलोकन केले.