गिधाड संवर्धन केंद्रास रशियन तज्ज्ञांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:53 AM2019-01-20T00:53:19+5:302019-01-20T00:53:23+5:30
श्रीवर्धन तालुक्यातील चिरगाव-बागाची वाडी आणि वाकी-नाणेमाचे येथील गिधाड अभ्यास, संशोधन व संवर्धन केंद प्रकल्पास नुकतीच भेट दिली.
- जयंत धुळप
अलिबाग : जागतिक शिकारी पक्षी अभ्यास, संशोधन व संवर्धन करणाऱ्या रॅप्टर्स रिसर्च कॉन्झर्वेशन नेटवर्क ऑफ रशिया या संस्थेचे पदाधिकारी व संशोधक इगोर करिअन आणि एल्विरा निकोलेन्को यांनी, महाडच्या सिस्केप संस्थेच्या श्रीवर्धन तालुक्यातील चिरगाव-बागाची वाडी आणि वाकी-नाणेमाचे येथील गिधाड अभ्यास, संशोधन व संवर्धन केंद प्रकल्पास नुकतीच भेट दिली.
२०१४ साली मंगोलिया येथे ‘सिनेरियस व्हल्चर्स’ या काळ्या गिधाडांच्या प्रजातीचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी, सिस्केपचे अध्यक्ष गिधाड संशोधक प्रेमसागर मेस्त्री यांना आंमत्रित करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हे रशियन गिधाड संशोधक येथे आले होते.
मेस्त्री यांनी गिधाडांच्या स्थलांतर अभ्यासासाठी बसविलेले रेडिओ ट्रान्समीटर्स आणि त्यांचे सातत्याने सुरू असलेले शास्त्रीय संशोधन भारतातील गिधाडांच्या संवर्धनासाठी नक्कीच मोलाचे ठरेल, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने रशियाचे पक्षिशास्त्रज्ञ इगोर यांनी दिली आहे. सिस्केपच्या वाटचालीत भविष्यात उभारण्यात येणाºया आंतरराष्टÑीय जैवविविधता अभ्यास आणि संशोधन केंद्राची घोषणा ‘लोकमत-लोकगौरव पुरस्कार’ स्वीकारताना प्रेमसागर मेस्त्री यांनी केली होती. त्याचाच पहिला संयुक्त संशोधन करार रशिया बरोबर संपन्न झाला आहे. ही सिस्केपच्या वाटचालीच्या यशाची महत्त्वाची पहिली पायरी असल्याचे सिस्केप संस्थेचे कार्यवाह डॉ. विकास नगरकर यांनी सांगितले.
‘सिनेरियस व्हल्चर्स’ ही गिधाडे हिवाळ्यामध्ये भारतात स्थलांतरित होतात, तर पावसाळ्यात ती पुन्हा मायदेशी मंगोलियाला परतीचा प्रवासा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.