कौशल्यावर आधारित अभ्यासक्र म सुरू करणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 07:01 AM2018-05-07T07:01:47+5:302018-05-07T07:01:47+5:30

विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

 Vocational training will be started in the center - Vinod Tawde | कौशल्यावर आधारित अभ्यासक्र म सुरू करणार - विनोद तावडे

कौशल्यावर आधारित अभ्यासक्र म सुरू करणार - विनोद तावडे

Next

कर्जत - विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेत आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. कर्जत येथील अभिनव प्रशालेतील क्र ीडा सभागृह आणि ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास स्थानिक आमदार सुरेश लाड, कर्जतच्या नगराध्यक्षा रजनी गायकवाड, एचपीसीएलचे सी. एन. कृष्णमूर्ती, सी. एस. किरण, विनंती केसरकर, सेवा सहयोगचे संचालक किशोर मोघे, संजय हेगडे, बजाज समूहाचे किरण मुकादम आदी उपस्थित होते. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. मुंबई यांच्याकडून अभिनव ज्ञान मंदिर संस्थेस वस्तूरूपाने मिळणाऱ्या देणगीचा स्वीकार व बजाज समूहाच्या आर्थिक मदतीतून व सेवा सहयोग मुंबई यांच्या सहकार्याने साकारलेल्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या नवीन इमारतीच्या दुसºया मजल्यावरील क्र ीडा सभागृह व ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे खजिनदार विनायक चितळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष गणेश वैद्य यांनी प्रास्ताविकात ८३ वर्षात संस्थेने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. विनाअनुदानित शाळा चालवणे कठीण झाले आहे. शाळेचे सुमारे एक कोटीचे अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे याकडे शिक्षण मंत्री यांचे लक्ष वेधले. यावेळी कर्जतमधील दानशूर संतोष भोईर आणि संस्थेच्या शिक्षिका डॉ. रंजना देशमुख, डॉ. स्नेहा उपाध्ये यांनी पीएचडी केल्याबद्दल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक मोडक यांनी भाषणात विविध विषय मांडले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रीतम लाड-नानचे व रश्मी देशपांडे यांनी केले तर सचिव जनार्दन मोघे यांनी आभार मानले. याप्रसंगी भगवान भोईर, विक्रम वैद्य, वि. रा. देशमुख, माधवराव गायकवाड, मीना प्रभावळकर, वालचंद ओसवाल आदी उपस्थित होते.

नापास शिक्का पुसण्यासाठी शासन प्रयत्नशील
शासनाने शिक्षण व्यवस्थेत पूरक असे आमूलाग्र बदल केले आहेत. शालेय अभ्यासक्र माबरोबर क्र ीडा नैपुण्याला गुणांमध्ये स्थान दिले आहे. तर क्र ीडा क्षेत्रात राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. अनेकदा नापास विद्यार्थी वाया जाणाºया वर्षामुळे गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी आपण नापास विद्यार्थ्यांची लगेच महिनाभरामध्ये परीक्षा घेऊन त्यांचा त्वरित निकाल लावल्याने हजारो विद्यार्थ्यांचे वाया जाणारे वर्ष वाचले आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यामुळे दिशा मिळाली आहे
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Web Title:  Vocational training will be started in the center - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.