कर्जत : राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून २५ जानेवारी साजरा करण्यात आला. या प्रसंगी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, मुलांनी विविध घोषणा देऊन मतदारांना जागृत केले. कर्जत तहसील कार्यालयाच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी या मतदार जनजागृती रॅलीत सहभागी झाले होते. निवडणूक नायब तहसीलदार दिनकर मोडक, मुख्याध्यापक राजाराम गायकवाड, उपमुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, कर्जत मंडल अधिकारी सोपान बाचकर, तलाठी एस. एम. हंगे आदी उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणातून निघालेली रॅली भाऊसाहेब राऊत चौक, डॉ. आंबेडकर चौक, आमराई मार्गे पुन्हा शाळेच्या प्रांगणात आली. (वार्ताहर)मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य1आगरदांडा : मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. राष्ट्रीय मतदार दिवशी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. लोकशाहीतील मतदान प्रक्रि येत सहभागी होऊन भारतीय लोकशाही प्रबळ व भक्कम करावी यासाठी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा भारत निवडणूक अयोगाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी नायब तहसीलदार संदीप पानमंद यांनी सांगितले. 2मुरु डमधील वसंतराव नाईक महाविद्यालयात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मुरु ड तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरु डतर्फे तालुकास्तरावर २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन ! उठा जागे व्हा, मतदान करा जनजागृती अभियानाचे आयोजन केले.सकाळी सर. एस.ए. हायस्कूल व अंजुमन हायस्कूलच्या ४५० विद्यार्थ्यांनी या प्रभात फे री सहभाग घेतला. शहरात मुख्य ठिकाणी प्रभात फेरी काढून या कार्यक्र माव्दारे जनजागृती केली. 3 चला मतदान करू या लोकशाही मजबूत करू या, मतदानाचा अमूल्य अधिकार बजावणे तुमचा हक्क आहे, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आदी मजकूर लिहिलेले फलक हातात घेऊन जनजागृती करण्यात आली. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुरु डच्या तहसीलदार योगिता कोल्हे यांनी केले आहे. या प्रभात फे रीमध्ये मुरु ड निवडणूक नायब तहसीलदार सिराज तुळवे, संतोष पवार, जयेश चोडणेकर आदी सहभागी झाले होते.
कर्जतमध्ये मतदार जनजागृती अभियान रॅली
By admin | Published: January 26, 2017 3:20 AM