उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 05:22 PM2023-08-11T17:22:15+5:302023-08-11T17:23:07+5:30

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

"Voter Registration and Public Awareness Program" at Veer Wajekar College, Uran. | उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम"

उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात "मतदार नोंदणी व जनजागृती कार्यक्रम"

googlenewsNext

मधुकर ठाकूर 

उरण : फुंडे महाविद्यालयात शुक्रवारी (११)शासन आपल्या दारी  निमित्ताने "मतदार नोंदणी व मतदार जनजागृती हा उपक्रम तहसीलदार उरण यांच्या मार्फत घेण्यात आला.

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी नव मतदार होणाऱ्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन केले. नायब तहसीलदार माधुरी म्हात्रे यांनी मतदार जागृती व मतदार नोंदणी विषयी तपशीलवार माहिती दिली व १८ वर्ष पूर्ण करण्याऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन केले. त्यासाठी फॉर्म कसा भरावा , जोडावी लागणारी कागदपत्रे, भरावयाची माहिती तसेच ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याची माहिती दिली.  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपापल्या गावात मतदार नोंदणीसाठी जनजागृती करावी असे आवाहन करून लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा यासाठी  मार्गदर्शनही केले.

विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. जी. पवार,  तलाठी ज्योती भालचीम व महसूल सहाय्यक शेख,प्रा. पंकज भोये,डॉ. राहुल पाटील, डॉ. आर. एस.जावळे, डॉ. श्रेया पाटील, डॉ. आमोद  ठक्कर आदी उपस्थित होते.

Web Title: "Voter Registration and Public Awareness Program" at Veer Wajekar College, Uran.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :uran-acउरण