78 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु; सकाळी साडेसात ते साडे अकरा पर्यंत 35.12% मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 01:48 PM2021-01-15T13:48:51+5:302021-01-15T13:48:56+5:30
सकाळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
रायगड : जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतीसाठी 302 मतदान केंद्रांवर आज सकाळी साडे सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. 614 जागांसाठी मतदान होत आहे. कोरोना नियमाचे पालन करून मतदारांना मतदानासाठी मतदान कक्षात प्रवेश देण्यात येत आहे. सकाळी साडेसात ते साडे अकरा पर्यंत 35.12% मतदान झाले आहे.
सकाळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहायला मिळाली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी पाेलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 1 लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत. 612 जागांसाठी 1 हजार 588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदाराने मास्क लावले नसेल तर त्याला कक्षात सोडले जात नव्हते. प्रत्येक मतदाराचे तापमान, ऑक्सिजन तपासले जात आहे. मतदान केंद्राबाहेर सॅनिटायझरही ठेवण्यात आल्याचे दिसून आले. सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.