मतदान हे राष्ट्रहितासाठी महत्त्वपूर्ण
By Admin | Published: January 26, 2017 03:24 AM2017-01-26T03:24:52+5:302017-01-26T03:24:52+5:30
कोणत्याही निवडणुकीत आपण केलेले मतदान हे नेहमीच राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असून ते स्वहितही साधणारे असते. त्यामुळे कोणत्याही
अलिबाग : कोणत्याही निवडणुकीत आपण केलेले मतदान हे नेहमीच राष्ट्रहितासाठी महत्त्वाचे असून ते स्वहितही साधणारे असते. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता निर्भयतेने मतदानाचे पवित्र व राष्ट्रीय कार्य सर्व पात्र मतदारांनी करावे, असे आवाहन रायगडच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शीतल तेली-उगले यांनी बुधवारी येथे बोलताना केले आहे.
येथील को.ए.सो.जनरल
अरुणकुमार वैद्य हायस्कूलच्या सभागृहात अलिबाग प्रांताधिकारी व तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्र मात तेली-उगले बोलत होत्या. जिल्हाधिकारी तेली-उगले पुढे म्हणाल्या, वयाच्या १८ व्या वर्षी आपणास मतदानाचा हक्क प्रप्त होतो आणि आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाते. हा हक्क आयुष्याच्या शेवटपर्यंत आपणास लाभतो. मतदान हे महत्त्वाचे असे दान आहे. त्यातून आपली लोकशाही बळकट व सक्षम होते. त्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करण्याचा संकल्प आजच्या या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त करणे आवश्यक आहे. या उपक्र मा निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचे जिल्हाधिकारी तेली-उगले यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर यावेळी बोलताना म्हणाले, आपली लोकशाही दिवसेंदिवस बळकट होत आहे, याचे श्रेय आपल्या देशातील नागरिकांचेच आहे. मतदार जनजागृतीसाठी सर्व युवा वर्गाने पुढे यावे. आपले मित्र, आपल्या परिवारातील पात्र सदस्य यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करु न घेण्यासाठी प्रयत्न करावेत. मतदान प्रक्रि येत युवा पिढीने सदिच्छादूत म्हणून कार्य करावे. ज्या योगे आपली लोकशाही अधिक भक्कम होऊ शकेल,असे नार्वेकर यांनी नमूद केले.
प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व विषद करत त्यांच्या विभागाने घेतलेल्या विविध उपक्र मांचा थोडक्यात आढावा घेतला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करु न कार्यक्र माचा शुभारंभ केला तसेच चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्रके दिले.