अलिबाग : कोकण पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी रायगड जिल्ह्यात सुमारे ८८.९0 टक्के मतदान झाले. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले. शुक्रवारी ३ फे बु्रवारीला १० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या निवडणुकीचा निकाल ६ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये १० हजार ९ मतदार आहेत. त्यापैकी ८८.९० टक्के मतदारांनी २८ मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरु वात झाली. सकाळी ८ ते १० या कालावधीत १६. ६४ टक्के, ८ ते १२ यावेळात ४४.१८ टक्के तर दुपारी २ वाजेपर्यंत ७२.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. दुपारी ४ वाजेपर्यंत ८८.९० टक्के मतदान झाले. रायगड जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. पेण : शिक्षकांच्या व शिक्षण क्षेत्रातील समस्या विधान परिषदेत अग्रहक्काने मांडणारा शिक्षकांचा प्रतिनिधी निवडून देण्याचा कोकण प्रांतातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेली कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शांततेत मतदान झाले. एकूण ३७ हजार ६७१ मतदार असलेल्या माध्यमिक शिक्षकांच्या हक्काच्या प्रतिनिधीसाठी झालेल्या शांततापूर्वक मतदानात पेणमध्ये एकूण ८०० पैकी ६८९ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्याची टक्केवारी ८६.१२ टक्के झाली. या निवडणुकीसाठी एकूण १० उमेदवार रिंगणात असून मुख्य लढत पुरोगामी शिक्षक आघाडीचे पनवेल नावडा येथील बाळाराम पाटील विरुद्ध शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू यांच्यातच होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.केंद्राच्या व राज्याच्या सत्तास्थानी असलेल्या भाजपाप्रणीत शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकाप आघाडीचे बाळाराम पाटील या राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या उमेदवारांमध्ये खरी लढत आहे. शिवसेनाप्रणीत शिक्षक सेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे व अपक्ष उमेदवार आ. रामनाथ मोते हे शिक्षक परिषदेची किती मते खेचतात यावरच खरे चित्र उभे असून यामध्ये भाजपा जिंकते की शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडी असा राजकीय सामना प्रत्यक्षात आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नवमतदार नोंदणीत नवीन शिक्षकांची झालेली मतदार नोंदणी त्यामुळे रायगडातील टक्का वाढला आहे. याशिवाय शेकाप, राष्ट्रवादी व काँग्रेस या राजकीय पक्षांच्या असलेल्या शिक्षण संस्था व तेथील शिक्षकवर्गाचा मिळणारा एकमुखी पाठिंबा यामुळे शिक्षक मतदार संघातही राजकीय पक्षांच्या वाढलेल्या सहभागामुळे ही रंगत वाढली आहे.ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यात २० हजार ७७८ एकूण मतदारांत अशोक बेलसरे, आ. रामनाथ मोते, केदार जोशी, ज्ञानेश्वर म्हात्रे हे उमेदवार भाजपाच्या कोट्यातील मते खेचणार आहेत. त्यामुळे वेणूनाथ कडूंचा किती मार्जिन घसरतो यावर भाजपाच्या यशापयशाची मदार आहे. याउलट ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, निरंजन डावखरे, हितेंद्र ठाकूर या नेतेगणांसोबत गणेश नाईक अशी राष्ट्रवादीची मोठी फौज प्रचारात बाळाराम पाटील यांच्यासाठी ठाणे, पालघरमध्ये उतरली होती. रायगडात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकाप आ. जयंत पाटील, आ. धैर्यशील पाटील, आ. पंडित पाटील, माजी आ. विवेक पाटील यांनी घणाघाती प्रचार के ला. कोकणातील विधान परिषद निवडणुकांवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची राजकीय रणनीती उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक कॅम्पेनमध्ये काँग्रेसचे नीलेश राणे, नारायण राणे, राष्ट्रवादीचे भास्कर जाधव, काँग्रेसचे कर्नल सुधीर सावंत यांनी तळकोकणातील भाजपाला दूर ठेवण्यासाठी या निवडणुकीत एकजुटीने काम केले आहे. त्याचा फायदा आजच्या झालेल्या मतदानात दिसून येतो. राष्ट्रवादीच्या कोट्यामधून शेकापला दिलेली जागा व शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादी नेतेगण, कार्यकर्ते यांनी केलेले भरीव काम व येणारा निकाल हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याने कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रायगडात सरासरी ९० टक्केच्या आसपास झालेले मतदान पाहता भाजपाला रोखण्यात हे पक्ष यशस्वी ठरतील असा एकं दर राजकीय माहोल आहे. (वार्ताहर)महाडमध्ये ९६ टक्के मतदानमहाड : कोकण पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज महाडमध्ये झालेल्या मतदानात महाडमध्ये ९६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महाड तालुक्यात एकूण ५५२ मतदारांपैकी ५३१ मतदारांनी आज मतदान केले. तहसील कार्यालयात झालेल्या या मतदानासाठी शेकाप काँगे्रस आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील, शिवसेनेचे ज्ञानेश्वर म्हात्रे, विद्यमान आमदार रामनाथ मोते अपक्ष, शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू व शिक्षक भारतीचे अनिल बेलसरे यांच्यातच खरी लढत होत आहे. तळा येथे शांततेत मतदानतळा : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक ३ फेब्रुवारी २०१७ रोजी असताना तळा तालुक्यात ९८ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत १०० पैकी ९८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७६ पुरुष व २२ महिलांनी हक्क बजावत ९८ टक्के मतदान केले आहे. हे मतदान तळा तहसील कार्यालयात अतिशय शांततेत पार पडले. निवडणूक केंद्राध्यक्ष म्हणून शरद मोते यांनी काम पाहिले असून सूक्ष्म निरीक्षक म्हणून विजेंद्रकुमार यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक तुषार सुर्वे, नीलेश गवाणकर, राजेश गंडाळे, मोरेश्वर फुलारे या महसूल कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले. नागोठण्यात ९२ टक्के मतदाननागोठणे : गुरु वारी कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान पार पडले. या निवडणुकीत नागोठणेतील उर्दू प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात १०० पैकी ९२ शिक्षकांनी मतदान के ले. यामुळे नागोठणेत ९२ टक्के मतदान झाले. मतपत्रिकेव्दारे मतदाननांदगाव/ मुरु ड: मुरु ड तहसीलदार कार्यालयात सकाळी ८ वाजल्यापासून कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीला मुरु ड तहसीलदार यांच्या दालनात सुरु वात करण्यात आली. या निवडणुकीत मतदान एव्हीएम मशीनव्दारे न होता मतपत्रिकेव्दारे घेण्यात आले. १७८ पैकी ८९ शिक्षक व ७६ शिक्षिकांनी हक्क बजावला. या निवडणुकीत ११ उमेदवार रिंगणात असून शुक्रवारी त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी ६ फेब्रुवारीला नवी मुंबई वाशी येथील हायस्कूलमध्ये होणार आहे.पनवेलमध्ये ८२.५७ टक्के पनवेल : कोकण शिक्षक मतदारसंघासाठी शुक्र वारी पनवेल तहसील कार्यालयात घेण्यात आलेले मतदान शांततेत पार पडले. शिक्षकांनी सकाळी ८ वाजल्यापासून पनवेल तहसील कार्यालयामध्ये लाईन लावून मतदान केले. यावेळी ८२.५७ टक्के मतदान झालेले आहे. सोमवारी मतमोजणी होणार असून या निवडणुकीत १० उमेदवार रिंगणात आहेत. पनवेल तहसील कार्यालयात चोख बंदोबस्तात कोकण शिक्षक मतदारसंघासाठी मतदान प्रक्रि या पार पडली. कर्जत तालुक्यातून ८६.३१ टक्के मतदान... कर्जत तालुक्यातून ८६.३१ टक्के मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात दहा उमेदवार आहेत, कर्जत तालुक्यात ६४३ मतदार असून त्यामध्ये ३७८ पुरु ष मतदार तर २६५ स्त्री मतदार आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानासाठी शिक्षकांनी रांग लावली होती. संध्याकाळी चार वाजेपर्यंत ६४३ मतदारांपैकी ५५५ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये २०६ स्त्री मतदार तर ३४९ पुरु ष मतदारांचा समावेश आहे.
रायगड जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान
By admin | Published: February 04, 2017 3:06 AM