पनवेल मध्ये 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान; एकही जागा बिनविरोध नाही!

By वैभव गायकर | Published: November 4, 2023 05:22 PM2023-11-04T17:22:01+5:302023-11-04T17:22:23+5:30

थेट सरपंचपदासाठी 47 तर सदस्यांसाठी 360 उमेदवार

Voting today for 17 gram panchayat elections in Panvel; No seat is uncontested! | पनवेल मध्ये 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान; एकही जागा बिनविरोध नाही!

पनवेल मध्ये 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी आज मतदान; एकही जागा बिनविरोध नाही!

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी ५ नोव्हेंबरला मतदान होत आहे. 73 मतदान केंद्रावर हे मतदान पार पडणार असुन याकरिता प्रत्येक केंद्रावर 5 असे 365 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. या निवडणुकीत सरपंच पदाच्या 17 जागांसाठी 47 तर 175 सदस्य पदासाठी 360 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दापोली, चिखले, विचुंबे, ओवळे, भिंगार, वावेघर, कोन, गुळसुंदे, दुंदरे, देवद, सोमाटणे, गिरवले, कळसखंड, न्हावे व तुराडे, मालडुंगे आदी ग्रामपंचायतीत निवडणूक पार पडत आहेत.

विशेष म्हणजे गावपातळीवरील राजकारण या ग्रामपंचायतीत पहावयास मिळत आहे.17 पैकी एकही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच बिनविरोध म्हणुन निवडणूक आलेला नाही.दुसऱ्या दिवशी दि.6 रोजी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. पोलीस प्रशासन देखील याकरिता सज्ज झाले आहे.अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त याकरिता ठेवण्यात येणार आहे.

मतदारांपुढे पायघड्या-

17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारांनी मतदारांना पायघड्या घालण्यास सुरुवात केली आहे.अनेक मतदार स्थलांतरित असल्याने त्यांना मतदानासाठी स्पेशल गाड्या करण्यात आल्या आहेत.

सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क निर्भयपने बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यास पुढाकार करावे. - विजय पाटील ( तहसीलदार, पनवेल)

Web Title: Voting today for 17 gram panchayat elections in Panvel; No seat is uncontested!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.