शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

मजुरी तर परवडेनाच; खते, बियाणेही खिसा करताहेत रिकामा

By निखिल म्हात्रे | Published: June 07, 2024 10:33 AM

रायगडमधील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या रागडमध्ये भात शेतीचे क्षेत्र घटले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. गेल्यावर्षी चांगला उतारा मिळाल्याने थोडी खुशी या शेतकऱ्यांमध्ये आहे; मात्र वाढलेल्या मजुरीमुळे भात शेती करायची की नाही, या विवंचनेत ते आहेत.

खरीप हंगामासाठी आता भातशेतीची तयारी शेतकरी करीत आहेत. बी-बियाणांची जमवाजमव सुरू आहे; मात्र खतांसह बी-बियाणांच्या दरातही दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मेहनत करून पदरात काय पडेल, अशा भावना ते व्यक्त करीत आहेत.

दरवर्षी ओला-सुका दुष्काळ, वणवा आणि वादळ-वारे या नैसर्गिक संकटांचा सामना करीत भात उत्पादक शेतकरी शेती करीत आहेत. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी मजुरीचे खर्चही वाढलेले आहे. आता नांगरणीही बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने करतात; मात्र डिझेलचे दर वाढल्याने नागंरणीचे दरही वाढले आहेत. खते, बियाणे, औषधांच्या दरातही वाढ झाली आहे.

नवनवीन प्रयोगांचा अवलंब

येथील भात उत्पादक शेतकरी नवनवीन प्रयोग करून भाताचे अधिक उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मजुरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकी पद्धतीने शेती करणे, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांची निवड करणे, पारंपरिक भातशेतीतील काही बाबींकडे दुर्लक्ष करून नवीन अवजारांचा उपयोग करताना दिसून येत आहेत.स्वस्त खते उपलब्ध होत नसल्याने संशोधित व संकरित भात बियाणांचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांना महाग खतांची खरेदी करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताचा वापर कमी करून मिश्र खत व संयुक्त खताचा वापर करावा. जेणेकरून उत्पन्न जास्त येईल. - सुभाष पाटील, कृषितज्ज्ञ.अधिक उत्पादन घेऊन आर्थिक उत्पन्न वाढावे, यासाठी रासायनिक खतांशिवाय पर्याय नसल्याने ही महागडी खते घ्यावीच लागतात. शेती करायची इच्छा राहिली नसून, वडिलोपार्जित परंपरा पुढे चालत राहावी, यासाठी शेती करीत आहे. - संदीप कदम, प्रगतिशील शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र