- मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानकरांच्या व्यावसायिक क्षेत्रातील आठ महिन्यांच्या काळातील पहिलाच आॅक्टोबर महिना अतिशय मंदीत गेला आहे. त्यामुळे या दिवाळीत व्यवसाय वाढेल या आशेने आतापासूनच लहान-मोठ्या स्टॉलधारक, व्यावसायिक ते हॉटेल्सधारक सर्वच जण तयारीला लागले आहेत. हॉटेल्सधारकांनी आपापल्या हॉटेल्समध्ये रंगरंगोटी तसेच आकर्षक सजावट,विद्युत रोषणाई केलेली आहेअनेक मंडळी ही इथल्या मिनीट्रेनच्या सफरीसाठी येत असतात. रेल्वे प्रशासनाने याकामी नेरळहून नियमितपणे पहाटे ६.४० वाजता एक गाडी तर दर शुक्रवारी नऊ वाजता एक गाडी माथेरानकरिता धावणार आहे. अनेकांना या गाडीची मजा लुटण्यासाठी वेळेअभावी हिरमोड जरी झाला तरीसुद्धा त्यांच्या आनंदात कुठल्याही प्रकारे विरजण न पडता त्यांना मिनीट्रेनच्या प्रवासासाठी दस्तुरी येथे मोटार वाहनाने उतरल्यावर अमन लॉज रेल्वे स्थानकावर शटल सेवेच्या माध्यमातून माथेरानपर्यंतच्या प्रवासाचा आनंद आपल्या बाळगोपाळांना सोबत घेऊन लुटता येणार आहे. माथेरानकरांसह कर्जत तालुक्यातील ज्यांचे पूर्णत: जीवनमान माथेरान या शहरावर निगडित आहे ते सर्वच पर्यटकांच्या आगमनाची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहेत.पर्यटक माथेरानकडे अधिकाधिक कशाप्रकारे आकर्षित होतील यासाठी आम्ही त्यांना ग्रह ताऱ्यांची माहिती आणि निरीक्षण करता यावे यासाठी आकाशगंगा केंद्रावर सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. उद्यानांत आकाश पाळणे तसेच मनोरंजनासाठी अन्य करमणुकीसाठी व्यापक दृष्टिकोन ठेवून सेवा पुरविण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध राहणार आहे.- रामदास कोकरे, प्रभारी मुख्याधिकारी,माथेरान नगरपरिषदपूर्वी इथे शाळा, कॉलेजच्या ट्रीप मोठ्या प्रमाणावर येत होत्या. त्यामुळे सर्वांना व्यवसाय मिळत होता. या ट्रीपच्या मुलांना सर्व सोयी-सुविधा कशाप्रकारे उपलब्ध होऊन त्यांची संख्या वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आगामी काळात अनेक प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास जाणार आहेत, त्यामुळे पर्यटन व्यवसाय आपोआपच वृद्धिंगत होण्याची चिन्हे दिसत आहेत.- प्रसाद सावंत,गटनेते,माथेरान नगरपरिषद
पर्यटकांच्या आगमनाची माथेरानकरांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 11:25 PM