कर्जत : तालुक्यात अद्याप भात खरेदी केंद्र सुरू झालेले नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने खासगी व्यापाºयांकडे शासनाच्या हमी भावापेक्षा कमी दराने भात विकावा लागत आहे. मुळातच परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांचे अधिकच नुकसान होत आहे.तालुक्यातील साळोख येथील कृषिभूषण शेतकरी कृष्णाजी कदम यांनी शेतकºयांची व्यथा मांडताना सांगितले की, शासनाचा हमी भाव १७५0 रु पये आहे. परंतु शासनाचे भात खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने आणि शेतकºयांना तातडीने पैशाची गरज असल्याने शेतकरी येथील खासगी व्यापाºयाला देईल त्या भावात भात विकत आहेत. हे व्यापारी शेतकºयाला नाममात्र भाव म्हणजेच अकराशे, बाराशे रु पये प्रति क्विंटल दर देत आहेत. यामुळे शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.- दरवर्षी १५ डिसेंबरला राजनाल्याला पाणी सोडण्यात येते. मात्र पूर्वीपेक्षा भात शेतीचे क्षेत्र कमी झाल्याने पाण्याचा वापर फारसा होत नाही. या उलट राजनाल्याचे काम निकृष्ट झाल्याने ते पाणी ज्यांनी वाल, तूर, कडधान्य लावले आहे त्यांच्या शेतात शिरून पीक कुजण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कर्जतमधील शेतकऱ्यांना भात खरेदी केंद्राची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:55 PM