शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

मुरुड तालुक्याला क्रीडांगणाची प्रतीक्षा, २००१ पासून क्रीडा धोरण कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 11:44 PM

ग्रामीण भागासह राज्यातील खेळाडूंमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे, त्यांच्यातील उपजत खेळाची गुणवत्ता वाढीस लागावी आणि कसदार खेळाडू निर्माण करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी

संजय करडेमुरुड : ग्रामीण भागासह राज्यातील खेळाडूंमध्ये क्रीडा नैपुण्य वाढीस लागावे, त्यांच्यातील उपजत खेळाची गुणवत्ता वाढीस लागावी आणि कसदार खेळाडू निर्माण करून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने २००१ पासून क्रीडा धोरण आखून विशेषत्वाने तालुका क्रीडांगण उभारण्याचा निर्णय घेतला. या धोरणान्वये मुरुड तालुक्यातील विहूर हे क्रीडा संकुल गेल्या पाच वर्षांपासून रखडले आहे.

मुरुड नजीकच्या विहूर ग्रामपंचायत हद्दीतील एक हेक्टर जागेत तत्कालीन राज्यमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते १० मे २०१३ भूमिपूजन झाले होते. एक कोटी रुपयांची तरतूदही बजेटमध्ये झाली होती. क्रीडा संकुलाकडे जाण्यासाठी रस्ता तसेच डोंगराळ जमिनीच्या सपाटीकरणासाठी आणखी निधीची आवश्यकता भासेल, असे तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. पुरोगामी राज्यात ११ जिल्ह्णात क्रीडा प्रबोधिनी स्थापन झाल्या असून, रायगड जिल्ह्णातही प्रबोधिनी कार्यान्वित व्हावी. लोकप्रतिनिधींनी मुरुडसारख्या ग्रामीण डोंगरी भागात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा संकुलासाठी पाठपुरावा करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

अलीकडे प्रत्येक जिल्ह्णात क्रीडा संकुल उभारण्याची जोरदार तयारी सुरू असून क्रीडा क्षेत्रावर राज्य शासनाने फोकस केल्याचे दिसत असले तरी तालुकास्थानी क्रीडा संकुलच अस्तित्वात नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणे अवघड वाटते. मुरुड नगरपरिषद पर्यटन व नियोजन समिती सभापती पांडुरंग आरेकर यांनी मुरुडमध्ये मेहनती खेळाडू आहेत; परंतु क्रीडांगण उपलब्ध नाही. नगर परिषदेच्या माध्यमातून वसंतराव नाईक कॉलेजच्या जवळ सुमारे तीन एकर खासगी जागा आरक्षित आहे. त्या जागेवर प्रस्ताव मंजुर झाल्यास मुरुड नगर परिषद चटई क्षेत्राच्या ४० टक्के वाढीव बांधकामाला भूखंडधारकांना परवानगी देण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगून स्वत: क्रीडा शिक्षक म्हणून या विषयात लक्ष पुरविणार असल्याचे स्पष्ट केले.

मुरुड शहरात जागा आरक्षित करणार, असे गेल्या कित्येक वर्षांपासून सांगण्यात येत आहे; परंतु प्रत्यक्षात क्रीडांगणासंबंधी कोणतीही कार्यवाही होत नाही, त्यामुळे मुरुड तालुक्यातून उत्तम दर्जाचे क्रीडापटू तयार होत नसल्याची खंत अनेक क्रीडापटू यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे