कर्जतला प्रतीक्षा मुध्याधिका-यांची, महिन्याभरापासून भार प्रभारींकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 02:24 AM2017-10-06T02:24:27+5:302017-10-06T02:24:36+5:30
कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे पद गेल्या काही महिन्यांत रिक्त झाले आहे. प्रभारी अधिकारी सध्या शहराचा भार वाहत असून, पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संजय गायकवाड
कर्जत : कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे पद गेल्या काही महिन्यांत रिक्त झाले आहे. प्रभारी अधिकारी सध्या शहराचा भार वाहत असून, पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘क’ वर्गाचा दर्जा असलेल्या रायगड जिल्ह्यातील कर्जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी डी. एन. अटकोरे हे २९ आॅगस्ट रोजी सेवा निवृत्त झाले. त्यानंतर तत्काळ कर्जत तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार एल. के. खटके यांना प्रभारी मुख्याधिकारी करण्यात
आले.
खटके यांना दुसºयाच दिवशी कर्जत नगरपालिका प्रशासनाकडून सहीपासून सर्व अधिकार देण्यात आले; परंतु महसूल क्षेत्रातील अधिकाºयांकडे नगरविकास विभागाचा पूर्ण अधिकार देताना शहराचा विकास काही काळासाठी खुंटणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घेतली नाही.
शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत आहे, त्यामुळे नळपाणी योजना आता वाढत्या नागरीकरणाला अपुरी पडत आहे. अशा वेळी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा तयार करण्यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा होण्याची गरज आहे.
शहराच्या विस्ताराबरोबरच नागरी सुविधा पोहोचण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. त्यात प्रभारी मुख्याधिकारी कमी पडू शकतात; परंतु पालिकेचे दररोजचे काम ठरलेले असल्याने कमी-अधिक प्रमाणात शहरात अनेक भागांत कचºयाचे प्रश्न निर्माण झालेले दिसून येत आहेत.
दुसरीकडे शहराच्या विकासाचे नियोजन करणारे पालिकेचे सभागृहदेखील पूर्ण वेळ आणि अनुभवी मुख्याधिकाºयाला मुकले आहे. डी. एन. अटकोरे यांनी सातत्याने पालिकेतील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात दुवा बनण्याचा प्रयत्न करून प्रशासनाचे काम पाहिले आहे. अशा वेळी नवीन मुख्याधिकारी मिळेपर्यंत कर्जत नगरपालिकेचे सर्व प्रशासन सूचना आणि मार्गदर्शन यांच्या प्रतीक्षेत आहे.