शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

श्रीगाव धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:53 PM

पाटबंधारे विभागाची निष्क्रियता : २६ वर्षे शेतकरी हक्काच्या पाण्यापासून वंचित

- जयंत धुळप

अलिबाग : तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रीगाव येथे १९८५ साली धरण बांधण्यात आले. परिसरातील गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन या वेळी करण्यात आले होते. शेतीला पाणी देण्यासाठी कालवे आणि पाइपलाइनही टाकण्यात आली; परंतु पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे पाइपलाइनमध्ये पाणी सोडताच ती फुटली आणि प्रत्यक्षात शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्या पाइपलाइन दुरुस्तीचा प्रस्तावच आजतागायत झाला नाही. त्यामुळे श्रीगाव धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचे समोर आल्यावर आता रायगड पाटबंधारे विभागाला खडबडून जाग आली आहे.

गेल्या २६ वर्षांत पाटबंधारे विभागाच्या निष्क्रियतेमुळे पाइपलाइनच्या दुरुस्तीचा विचारच झाला नाही आणि श्रीगाव धरणाच्या लाभक्षेत्रातील श्रीगाव आणि मेढेखार या गावांतील २५० हून अधिक शेतकरी तब्बल २६ वर्षे हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले. त्यांच्या शेतजमिनी नापीक राहिल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत, श्रीगावचे शेतकरी मनोज पाटील, मेढेखारचे शेतकरी कमलाकर पाटील आदीनी रायगड पाटबंधारे विभागाकडे केलेल्या पाठपुराव्याअंती उघडकीस आले आहे.

श्रीगाव धरणातील पाणी शेतकºयांना मिळाल्यास श्रीगाव, मेढेखार आणि कातळपाडा या गावांतील १०० एकरांपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येऊ शकेल. या शेतीत दुबार पीक घेता येणार असून, भाताबरोबरच भाजीपाला व मत्स्यशेती होऊन शेतकºयांना आर्थिक लाभ होईल. तरी १९९२ मध्ये शेतीच्या पाण्यासाठी टाकलेली; परंतु आजतागायत बंदावस्थेत असलेली पाइपलाइन दुरुस्त करून पाणी देण्याची व्यवस्था करावी, असे लेखी पत्र श्रमिक मुक्ती दलाने ३ सप्टेंबर २०१८ रोजी रायगड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंताधनंजय गोडसे यांना दिले आहे. अन्यथा, आंदोलन करण्यात येईल, असेही या वेळी नमूद करण्यात आले आहे.

तब्बल २६ वर्षांनंतर पाटबंधारे विभागास जाग आली. श्रीगाव धरणाच्या पाण्याचा लाभ घेऊ शकणाºया शेतकºयांनी आपणाकडे पाण्याची मागणी अगोदरच नोंदविली आहे. त्या वेळी झालेल्या चर्चेनुसार अभियंता एस. एस. पाटील हे धरण परिसरात पाहणीसाठी येणार होते. मात्र, ते आले नाहीत वा या बाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.भातशेती नापीक करण्याचा प्रयत्नखारलँड विभागाने गेल्या ३० वर्षांत समुद्र सरक्षक बंधाºयांची दुरुस्ती केलेली नाही. अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेकडो एकर भातशेतीत समुद्राचे खारेपाणी घुसून ती पूर्णपणे नापीक झाली. ही भातशेती नष्ट करून शेतजमीन ओसाड ठरवण्यासाठीचा पहिला प्रयत्न होता.तर तालुक्यातील शेतकºयांना जे श्रीगाव धरणाचे पाणी शेतीकरिता द्यायचे ते न देता, शेतकºयांच्या जमिनी ओसाड करायच्या हा दुसरा प्रयत्न आहे. शेतजमिनी नापीक झाल्यावर त्यांना ओसाड घोषित करून त्या बड्या भांडवलदार व उद्योगांना कवडीमोल किमतीने शेतकºयांना विकायला लावण्यास भाग पाडणे.हे गेल्या अनेक वर्षांचे कटकारस्थान आहे. जिल्ह्यातील किती धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांना त्यांच्या हक्काचे शेतीकरिता पाणी मिळाले आहे, याची माहिती जिल्हाधिकाºयांकडे मागणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी