वारे जांभूळवाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 10:56 PM2020-03-10T22:56:22+5:302020-03-10T22:56:30+5:30

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या वाड्यांना जोडणाºया रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे.

Waiting for wind repairs to Jambulwadi road; Rural conditions due to the dirt road | वारे जांभूळवाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल

वारे जांभूळवाडी रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डेमय रस्त्यामुळे ग्रामस्थांचे हाल

Next

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. वाड्यापाड्यात जोडणाऱ्या या रस्त्यांकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी जांभूळवाडीतील लोकांचे हाल होत असून दळणवळणाची व्यवस्था नसल्याने त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.

आदिवासी बांधव उपजीविकेसाठी शेतीव्यतिरिक्त भाजीपाला लागवड, पावसाळ्यात उगवणाºया रानभाज्या शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. मात्र खराब रस्त्यांअभावी कोणतेही वाहन वस्तीवर येत नसल्याने डोक्यावर ओझे घेऊनच बाजार गाठावे लागते. एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेण्यासाठी चादरीची डोली करून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते.

या ठिकाणी अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने मोलमजुरीची कामे करून नागरिक उदरनिर्वाह करतात. मात्र लोकप्रतिनिधींनी येथील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने या भागातील लोकांचे जीवन मेटाकुटीला आले आहे. काही ठिकाणी २० ते २५ वर्षांपासून रस्त्यांची कामे झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या वाड्यांना जोडणाºया रस्त्यांची अवस्थाही बिकट आहे. तीव्र उतार व चढावावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी वारे जांभूळवाडी रस्त्यावर मातीचा मुलामा चढवून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो उपायही कुचकामी ठरत आहे. रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य दिसून येत असून त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. तातडीने उपाययोजना करून वारे जांभूळवाडी रस्ता चांगल्या दर्जाचा तयार करावा, अशी मागणी येथील आदिवासी बांधव करत आहेत.

वीस वर्षे झाली तरी आमच्या वाडीचे रस्ते झाले नाहीत, खराब रस्त्यांमुळे येथे गाड्या येत नाहीत. सरकारकडून आदिवासी भागात लक्ष दिले जात नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी चार किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. - यशवंत कैवारी, जांभूळवाडी ग्रामस्थ

वाडीच्या रस्त्याची अवस्था खराब आहे. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम झाले नसल्याने मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवासात त्रास होतो. गाड्यांचीही वारंवार कामे निघतात. त्यामुळे रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी. - प्रकाश शिंगवा, जांभूळवाडी ग्रामस्थ

Web Title: Waiting for wind repairs to Jambulwadi road; Rural conditions due to the dirt road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.