शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

वाकण - खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:47 PM

प्रवासी समाधानी : कोकणात येणाऱ्यांचा प्रवास सुखकर

पाली : वाकण-पाली-खोपोली या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे गणपती सणासाठी गावाला येणाºया चाकरमानी प्रवासी व वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून एमएसआरडीसीकडून पाली-खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

वाकण -पाली -खोपोली महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: दुर्दशा झाली आहे. पावसाचे पाणी साचल्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट होते, या रस्त्यावरून वाहन चालविताना खड्डे चुकविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणाºया वाहनचालक, नोकरदार, प्रवाशांना पाठ, कंबर, मणक्याचे आजार आदी दुखण्याने ग्रासले आहे. या सर्व परिस्थितीकडे एमएसआरडीसीचे वारंवार लक्ष वेधूनही खड्ड्यात हरवलेल्या वाकण-पाली - खोपोली महामार्ग सुस्थितीत आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नव्हते. अखेर गणपती सणानिमित्ताने एमएसआरडीसीकडून मागील तीन चार दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.

वाकण -पाली -खोपोली महामार्गाचे सर्व खड्डे गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी बुजविले जाणार आहेत. या महामार्गावर आजही अवजड वाहनांची सतत वाहतूक व मुसळधार पाऊस यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते; आता खड्डे भरण्यासाठी खडी, दगड, डांबर वापरून बुजविण्यात येत आहेत.वाकण-पाली-खोपोली महामार्गावरील खड्डे भरण्यात येत असल्याने वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाने उघडीप दिल्यास या मार्गावरील सर्व खड्डे डांबर मिक्स खडीने भरून महामार्गावरून गणपतीसाठी कोकणात येणाºया चाकरमानी प्रवाशांसाठी खड्डेमुक्त करण्यात येईल.- आर.एस. फुले,व्यवस्थापकीय अभियंता, एमएसआरडीसी