लोकमत न्यूज नेटवर्कपोलादपूर : तालुक्यातील फणसकोंड येथे जाकमाता येथील तलावाची संततधार पावसामुळे भिंत कोसळल्याने नळपाणी पुरवठा योजना बंद पडली आहे.याबाबत ज्ञानेश्वर जगताप व सुरेश चव्हाण आदी ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षीे स्वदेश फाउंडेशन या संस्थेमार्फत व सहकार्यातून नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. भिंत कोसळल्याने फणसकोंड, विष्णूवाडी पाणीपुरवठा खंडित झाला असून, या तलावाची भिंत कित्येक वर्षांपूर्वीचे बांधकाम असल्याने भिंत कोसळल्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडली असून, आता पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना विहिरीचा आधार घ्यावा लागणार आहे. गेला आठवडाभर संततधार पावसामुळे भिंत कोसळली. यामुळे येथील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एप्रिल, मे महिन्यांत पाणीटंचाईच्या सावटातून सावरलेल्या ग्रामस्थांना पावसाळा सुरू झाल्याने टंचाईपासून मुक्तता मिळण्याआधीच तलावाची भिंत कोसळल्याने पुन्हा पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे दिसून येत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तलाव बांधकाम दुरुस्तीची मागणी केली आहे.
तलावाची भिंत कोसळली
By admin | Published: June 30, 2017 2:53 AM