तमनाथ येथे घरावर कोसळली संरक्षक भिंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:01 AM2017-07-19T03:01:21+5:302017-07-19T03:01:21+5:30
दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे एका घराची संरक्षक भिंत दुसऱ्या घरावर कोसळली आहे. यात कोणतीही जीवितहानी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील तमनाथ येथे एका घराची संरक्षक भिंत दुसऱ्या घरावर कोसळली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे प्रचंड नुकसान झाले असून घरातील साहित्य पावसाच्या पाण्याने भिजले.
सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कर्जत तमनाथ येथील अरु ण रसाळ यांच्या राहत्या घरावर शेजारी असणारे नामदेव भोईर यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळली. यात अरुण रसाळ यांच्या घराचे नुकसान झाले आहे. यात घरातील १५० किलो तांदूळ व इतर साहित्य भिजले आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिक पोलीस पाटील आणि तलाठी सजाचे प्रभारी तलाठी एस.एम. होंगे यांनी या घटनेची पाहणी करून पंचनामा केला आहे. तरी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त अरुण रसाळ यांनी केली आहे.