नवी मुंबई : अत्याधुनिक नवी मुंबई शहराची उभारणी करणाऱ्या सिडकोने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारले आहेत, तर अनेक प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. यात खारघर हेवन हिल्स या आणखी एका प्रकल्पाची भर पडणार आहे. खारघर टेकड्यांच्या शांत, निरव आणि निसर्ग संपन्न परिसरात हा प्रकल्प उभारण्याची घोषणा सिडकोने केली आहे. यात निवासी व्हिला, रिसॉर्ट, तसेच नॅचरोपॅथी सेंटर आदींचा समावेश असणार आहे. एकूणच देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबई शहराला खºया अर्थाने जागतिक दर्जा प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून विविध स्वरूपांचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प उभारले जात आहे. खारघर नोड सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे येथील निसर्गरम्य परिसराचा उपयोग करून घेण्यावर सिडकोने भर दिला आहे. त्यानुसार, या ठिकाणी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले आहे, तसेच सेंट्रल पार्क हे उद्यानही याच परिसरात आहे. भविष्यात खारघरमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, खारघरच्या निसर्गरम्य जागेवर सुमारे ३५0 एकरच्या विस्तीर्ण जागेवर कॉर्पोरेट पार्क विकसित केले जाणार आहे. या पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल स्टेडियम आणि फुटबॉल प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा सिडकोचा मानस आहे. आता यात खारघर हेवन हिल्स प्रकल्पाची भर पडणार आहे. मुंबई व नवी मुंबईतील वर्दळीपासून दूर खारघरच्या हिरव्यागार टेकड्यांच्या सान्निध्यात हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ जुलै रोजी प्रतीकात्मक स्वरूपात या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.मुंबईपासून हाकेच्या आतंरावर असलेल्या या हेवन हिल्स स्टेशन परिसरात उच्चभ्रू वसाहत विकसित केली जाणार आहे, तसेच एक अत्याधुनिक नॅचरोपॅथी केंद्र उभारण्यात येणार आहे. शहरातील गजबजाट आणि दरदिवशीच्या कोलाहटापासून कुटुंबीयांसह काही क्षण शांततेत व्यतित करता यावेत, या दृष्टीने या परिसरात एक रिसॉर्टही विकसित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने प्रकल्पाच्या एकूण २५0 एकर जागेपैकी ३९ टक्के क्षेत्र मोकळे ठेवले जाणार आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय विमानतळापासून २0 मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा हेवन हिल्स प्रकल्प आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. सध्या हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहे, परंतु लवकरच याबाबत प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात केली जाईल, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.शहरीकरण, निसर्गाचा संगमप्रस्तावित खारघर हेवन हिल्स प्रकल्प खारघर रेल्वे स्थानकापासून अवघ्या ३.0८ किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे, मुख्य शहरांना जोडणाºया रस्त्यांचे जाळेही यापूर्वीच विकसित करण्यात आले आहे. उत्तम दर्जाच्या दळवळणाच्या सुविधा असलेला खारघर हेवन हिल्स हा प्रकल्प म्हणजे शहरीकरण आणि निसर्ग यांचा परिपूर्ण संगम असल्याचे मत सिडकोने व्यक्त केले आहे.