शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

रायगड जिल्ह्यात चार नगर पंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर; सर्वच पक्षांचा स्वबळाचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 1:11 AM

आरक्षणामुळे दिग्गजांचे पत्ते कट 

तळा : रायगड जिल्ह्यात चार नगर पंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आले. या आरक्षणात ५०% पेक्षा जास्त महिलांना आरक्षण देण्यात आले. त्यामुळे सर्वच नगर पंचायतींमध्ये महिलाराज येणार आहे.

तळामध्ये प्रभाग रचना व महिला आरक्षण आल्याने सत्ताधाऱ्यांमधील अनेक दिग्गजांचे राजकीयदृष्ट्या पत्ते कट झाले आहेत. या न. पं.मध्ये १७ पैकी ९ महिला तर ८ पुरुष अशी आरक्षण सोडत निघाली आहे. असे आरक्षण झाल्याने सर्वच पक्षांवर उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांकडून स्वबळावर लढण्याची तयारी दाखविण्यात येत आहे.

प्रभाग रचना व आरक्षण पडल्याने सर्वच राजकीय पक्षांचे नगरसेवक, आजी-माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचे पत्ते कट झाले आहेत. ते आपल्या प्रभागाशेजारी व इतर प्रभागाची उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत. या वेळी मागासवर्गीयांना जातीच्या दाखल्यासोबत जात पडताळणीचा दाखला उमेदवारी अर्ज सादर करताना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे चहूबाजूंनी डोकेदुखी वाढली आहे. इच्छुक उमेदवारांची उमेदवारी मिळविण्यासाठी धावाधाव, प्रभाग शोधण्यासाठी पळापळ आणि निवडून येण्यासाठी तारेवरची कसरत सुरू आहे. यामध्ये इच्छुक उमेदवारांचा अधिक भरणा आहे. त्यातच प्रभागात बदल झाल्याने उमेदवारांच्या डोक्याचा ताप वाढला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी एक वर्षापासून त्यांच्या प्रभागात निवडणुकीची बांधणी करून वैयक्तिक संपर्क वाढविला होता. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. मात्र या आरक्षणामुळे त्यांची स्वप्ने धुळीस मिळालेली आहेत. 

राजकीय वातावरण तापले २०१५ मध्ये झालेल्या तळा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने एकहाती सत्ता स्थापन केली होती. मात्र पाच वर्षांनंतरही दैनंदिन स्वच्छता, पाणीपुरवठा समस्या, डम्पिंग ग्राउंडची अवस्था, अर्धवट राहिलेली विकासकामे, गटारे स्वच्छता आदी अनेक समस्या आजही आ वासून उभ्या आहेत. येत्या काही दिवसांत सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफ डागण्यात येणार असल्याने निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.  तळा नगर पंचायतीवर कोणत्या पक्षाची सत्ता स्थापन होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक