पाली शहरात कचऱ्यामुळे पसरले घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:16 AM2019-05-18T00:16:07+5:302019-05-18T00:16:28+5:30

सुंदर पाली व स्वच्छ पाली असा नारा सातत्याने दिला जात असला तरी पालीच्या गतवैभवाला जागोजागी ठेवण्यात आलेल्या तुटलेल्या कचराकुंड्या मारक ठरल्या आहेत.

Waste empire spread in the city of Pali; Citizens' Health Hazards | पाली शहरात कचऱ्यामुळे पसरले घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याला धोका

पाली शहरात कचऱ्यामुळे पसरले घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याला धोका

googlenewsNext

- विनोद भोईर

पाली : सुंदर पाली व स्वच्छ पाली असा नारा सातत्याने दिला जात असला तरी पालीच्या गतवैभवाला जागोजागी ठेवण्यात आलेल्या तुटलेल्या कचराकुंड्या मारक ठरल्या आहेत. अशातच पालीत कचरा व्यवस्थापन सातत्याने कुचकामी ठरत असून पालीत नेहमीच घाणीचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तुटलेल्या कचराकुंड्या व त्यातून केरकचरा ओढणारे पाळीव प्राणी हे दृश्य पाहून कचरा व्यवस्थापन किती कुचकामी आहे, याची प्रचिती येते. रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्या घाण केरकचºयाने तुडुंब भरलेल्या आहेत, त्यातून दुर्गंधी बाहेर पडून नागरिकांना येता-जाता याचा प्रचंड त्रास सोसावा लागतो. अशातच पालीत दाखल होणाºया भाविक भक्तांनादेखील नाक धरुन जाण्याची नामुष्की ओढवते.
उघड्यावरील घाणीमुळे अस्वच्छता व रोगराईची भीती वाढली आहे. पालीत स्वच्छता अभियानाचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. गुरेढोरे अन्नाच्या शोधात कचराकुंड्यांना चारी बाजूने घेरतात. कचराकुंड्यात तोंड खुपसतात व कुंड्यातील प्लॅस्टिक व इतर पदार्थ गिळंकृत करतात. परिणामी अनेकदा गुरेदेखील दगावत असल्याच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यात तर कचºयाची समस्या अधिक उग्र रुप धारण करण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
गटारे, नाले कचºयामुळे तुंबले असून, त्यातील घाण व सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याचा दुष्परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होत आहे.
पालीतील कचराकुंड्या ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांकडून उपसल्या जातात. परंतु पालीच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत व पालीतील कचºयाच्या ढिगासमोर मोजके सफाई कर्मचारी किती कष्ट उपसणार हेदेखील पाहणे गरजेचे आहे.
अनेकदा पालीला स्वच्छ करण्यासाठी श्री सदस्यांचे हात अधिक मोलाची कामगिरी बजावताना दिसत आहेत. ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या पालीच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पालीत स्वच्छता राखण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाबरोबरच तहसील कार्यालय व बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट आदींनी पाली गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कचराकुं ड्यांची गरज
सामाजिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था व सक्षम नागरिकांनी ग्रामपंचायतीला कचराकुंड्या भेट स्वरुपात देणे गरजेचे आहे. सर्वांनी मिळून एक पाऊल स्वच्छतेकडे टाकल्यास स्वच्छ पाली, सुंदर पालीचा नारा प्रत्यक्षात कृतीत उतरलेला पहावयास मिळेल. अन्यथा पालीला बकाल स्वरुप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पाली शहराचा विस्तार झपाट्याने होत असून त्या प्रमाणात ग्रामपंचायतीला शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याने जेवढा निधी येतो त्यामध्ये आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. लवकरच कचरा कुंड्यांची व्यवस्था करणार आहोत.
- गणेश बालके, सरपंच पाली ग्रामपंचायत

Web Title: Waste empire spread in the city of Pali; Citizens' Health Hazards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड