कचऱ्यापासूनच खतनिर्मिती कागदावरच

By admin | Published: February 3, 2016 02:21 AM2016-02-03T02:21:03+5:302016-02-03T02:21:03+5:30

नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा

From waste to manmade paper | कचऱ्यापासूनच खतनिर्मिती कागदावरच

कचऱ्यापासूनच खतनिर्मिती कागदावरच

Next

कर्जत : नेरळमधील कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प कागदावरच राहिला आहे. डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर दररोज येणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रि या करणारा प्रकल्प जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही.दरम्यान, डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश टोकरे यांनी कल्याण-कर्जत राज्य मार्गालगत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न केला होता. नेरळ शहरात कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यासाठी वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. त्यावेळी पुढील आठ दिवसात कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात होईल, असे आश्वासन उप मुख्य कार्यकारी पी. एम. साळुंखे यांनी दिले होते. परंतु एक वर्ष उलटूनही या खतप्रकल्प निर्मितीला अद्याप सुरु वात झालेली नाही. त्यामुळे नेरळ शहरात जमा झालेला कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये दररोज जाळण्यात येतो. सायंकाळच्या वेळी प्रचंड धुरामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास देखील होत आहे.
नेरळ शहरात जमा झालेला कचरा हा कर्जत - कल्याण रस्त्यालगत डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. नेरळ डम्पिंग ग्राऊंडमध्ये जमा झालेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. पुणे येथील एका संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. त्यात ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची स्वतंत्र यंत्रणा उभारून त्यावर प्रक्रि या करून खतनिर्मिती करण्यात येणार होती. त्यावेळी त्या संस्थेने येथे येवून जागेची पाहणी केली होती. या खतप्रकल्प निर्मितीसाठी जिल्हा परिषदेकडून ३० लाख रुपये आणि उर्वरित खर्च जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या निधीतून करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंखे यांनी दिली होती. परंतु एक वर्ष उलटूनही अद्याप या खत प्रकल्पाचे काम सुरू न झाल्याने नेरळ शहरात जमा झालेला सर्व कचरा हा येथील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकण्यात येतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. नेरळ ग्रामपंचायतीने लवकर जिल्हा परिषदेकडे खतनिर्मिती प्रकल्पासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ( वार्ताहर)

Web Title: From waste to manmade paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.