रस्त्यालगत गटारात प्लास्टिक पिशव्यांचा खच; गंभीर प्रश्नकडे कानाडोळा न करता कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 01:14 AM2021-03-23T01:14:35+5:302021-03-23T01:15:21+5:30
दुष्परिणाम माहीत असूनही ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वापर
आगरदांडा : मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत आसणा-या पाण्याच्या गटारात प्लास्टिक पिशवीच साम्राज्य पसरलेला दिसून येत आहे. प्लास्टिकचे दुष्परिणाम माहीत असले तरी त्याचा वापर ग्रामीण भागात होताना दिसत आहे. तरी ग्रामीण भागात प्लास्टिक पिशवी कधी मुक्त होणार, असे सामान्य नागरिक विचार आहेत.
आज प्लास्टिकने सगळ्यांचेच जीवन व्यापले आहे. वापरण्यास सोपे, सहज उपलब्ध आणि स्वस्त अशा या गुणधर्मामुळे आपले जगणे प्लास्टिकमय झाले आहे. पण प्लास्टिक नष्ट होत नाही, ते आपल्या पर्यावरणात टिकून राहते आणि अंतिमत: पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरत असल्यामुळे राज्यात प्लास्टिकवर बंदी घातली असली तरी प्लास्टिकच पिशवीच्या वापर ग्रामीण भागात सर्रास होताना दिसत आहे. दैनंदिन जीवनात होत असलेल्या प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे हवा आणि पाणी प्रदूषण दिवसेंदिवस जीवनशैलीचा गळफास बनू लागला आहे. प्लास्टिकपासून जे धोके संभवतात त्यापासून काळजी घेतली पाहिजे, हे राज्य सरकारच्या मार्फत अनेक वेळा सांगत आहेत. तरीदेखील प्लास्टिकच्या विळख्यातून बाहेर पडू शकलो नाही.
राज्यात ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली गेली होती; मात्र ही बंदी झुगारून सर्रास या पिशव्याचा वापर होताना दिसत आहे. तरी ग्रामपंचायत सरपंच यांनी या गंभीर प्रश्नकडे कानाडोळा न करता पिशवी वापर करणा-यावर दंडात्मक
कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक करीत आहेत.