नेरळ : कर्जत तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून तालुक्यातील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले आहेत. तरी देखील शासनाचे पाण्याचे टँकर बहुसंख्य गावात पोहचत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक संस्था पुढे येत आहेत,त्यातून राजकारणविरहित सामाजिक काम करणाऱ्या सोशल मीडियावरील ग्रुपने पुढाकार घेऊन पाणीटंचाईग्रस्त झुगरेवाडीला बोअरवेल खोदून आणि वीज पंप टाकून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय करून दिली. दरम्यान, झुगरेवाडी ग्रामस्थ हे त्या बोअरवेलसाठी लावलेल्या वीज मीटरचे बिल वर्गणी काढून भरणार आहेत.झुगरेवाडी या ३०० हून अधिक घरे असलेल्या गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तेथील ग्रामस्थ हे गेली काही महिने पाणी विकत घेत असून रायगड जिल्हा हद्दीजवळ असल्याने रायगड जिल्ह्याचे प्रशासन त्या ठिकाणी पोहचत देखील नाही. परिणामी विहिरी आटलेल्या झुगरेवाडीमध्ये पिण्याचे पाणी द्या अशी मागणी नाथा झुगरे या ग्रामस्थाने सामाजिक कार्यकर्ते भरत भगत यांना सांगितली. यावर सामाजिक बांधिलकी म्हणून काम करणाºया ग्रुपचे सदस्य भरत भगत यांनी ही बाब ग्रुपवर चर्चेस आणली. यावेळी सोशल मीडियावरील या गु्रपने देखील आदिवासी भागाला पाणी देण्यासाठी तत्काळ पुढाकार घेऊन जमिनीमध्ये पाणी कुठे आहे याचा शोध घेतला. भगत हे स्वत: पाणी शोधणाºया टीमबरोबर झुगरेवाडी गावाच्या आजूबाजूला फिरत होते. पाणी असलेल्या जमिनीचा शोध लागल्यानंतर ग्रुप अॅडमिन यांनी जागा मालक गणपत झुगरे यांना बोअरवेल खोदण्यासाठी आपली काही जमीन देण्याची विनंती केली.झुगरेवाडी ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे त्या ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीतील घराचे छप्पर हे गतवर्षी उडून गेले होते आणि ते छप्पर उभारून देण्याचे काम कर्जतच्या सोशल मीडियावरील गु्रपने केले होते. ही माहिती गणपत झुगरे यांना त्यांचे जावई बाळकृष्ण पादिर यांनी दिल्यानंतर ग्रुपच्या सामाजिक बांधिलकीची ओळख झाल्याने गणपत झुगरे यांनी बोअरवेलसाठी जागा देण्याची तयारी दर्शविली.त्यामुळे जागा प्रश्न निकाली निघाल्यानंतर १३ मे रोजी ग्रुपचे पथक झुगरेवाडी गावात पोहचले. तेथे ११० फुटावर बोअरवेलला पाणी लागले, परंतु परिसरात कितीही पाणीटंचाई आली तरी त्या बोअरवेलचे पाणी आटू नये यासाठी भरत भगत यांनी ती बोअर तब्बल ३११ फूट खाली नेली. भरपूर पाणी लागलेल्या बोअरवेलसाठी वीज मीटर घेऊन आणि वीज पंप लावून पाणीपुरवठा सुरू करण्यातआला.यावेळी भरत भगत यांच्यासह किशोर शितोळे, मिलिंद विरले, संदीप म्हसकर, किशोर गायकवाड, किसन शिंदे, दादा पादिर, दिनेश कालेकर, परेश भगत आणि विलास शेळके तसेच गणेश पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. भरत भगत यांनी बोअरवेलची पूजाअर्चा केली तर किशोर शितोळे यांनी श्रीफळ वाढविल्यानंतर बोअरवेलचे पाणी सुरू करण्यातआले.दररोज पाणी विकत घेणाºया ग्रामस्थांच्या चेहेºयावर आनंद होता, तर १५ मे रोजी आपल्यासाठी खास खोदलेली बोअरवेल आणि त्यांचे पाणी भरताना अनेक महिलांच्या डोळ्यात पाणी आले.आमच्या गावातील महिला या चई येथे ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीवर जाऊन पाणी भरायच्या.आता त्यांचे कष्ट वाचणार आहेत.- पालीबाई झुगरे, ग्रामस्थ महिलाआम्हाला मदत करणाºया या ग्रुपबरोबर आमचे रक्ताचे नाते नाही की ते आमच्या जातीचे नाहीत, तरी देखील किमान ९० हजार रुपये एवढा मोठा खर्च वर्गणी काढून केला त्या लोकांचे विचार फार मोठे असले पाहिजेत.आता आम्हाला पाणी विकत घ्यावे लागणार नाही आणि दररोज घराजवळ पाणी मिळेल. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत.- नाथा झुगरे, ग्रामस्थ
पाणीटंचाईग्रस्त झुगरेवाडीला बोअरवेलचे पाणी; पाणीप्रश्न सुटणार असल्याने ग्रामस्थ समाधानी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 11:52 PM