शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

नागोठणे येथे जलवाहिनी फुटली

By admin | Published: February 20, 2017 6:21 AM

येथील एमआयडीसीकडून जेएसडब्ल्यू कंपनीकडे जाणारी जलवाहिनी फुटून वाहणारे पाणी शेतात घुसल्याने शेतात लागवड

नागोठणे : येथील एमआयडीसीकडून जेएसडब्ल्यू कंपनीकडे जाणारी जलवाहिनी फुटून वाहणारे पाणी शेतात घुसल्याने शेतात लागवड केलेली वाल - पावटा कडधान्यांची पिके धोक्यात आली आहेत. ही जलवाहिनी जेएसडब्ल्यू कंपनीचीच असून पाणी शेतात घुसल्याने कडधान्यांची पिके कुजणार आहेत, असे नुकसानग्रस्त शेतकरी तथा वरवठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणपत किसन म्हात्रे यांनी सांगितले. येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने के. टी. बंधारा ते जेएसडब्ल्यू कंपनी, डोलवी अशी जलवाहिनी कार्यरत आहे. शनिवारी मध्यरात्री रेल्वे फाटकानजीक ही जलवाहिनी फुटल्याने त्यातून वाहणारे पाणी परिसरातील शेतीत घुसले. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत फुटलेल्या जलवाहिनीतून पाणी वाहत होते असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या या भागातील बहुसंख्य शेतांमध्ये वाल, पावटा, तूर, चवळी आदी कडधान्यांचे पीक लावले असून शेंगा बहरायला प्रारंभ झाला असतानाच अचानक ही जलवाहिनी फुटून त्यातील पाणी शेतात घुसल्याने उभे पीक नष्ट होण्याच भीती निर्माण झाली आहे. साधारणत: २५ ते ३० एकर शेतात हे पाणी घुसले असून त्यात वरवठणे गावातील गणपत म्हात्रे, उत्तम म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, रामचंद्र म्हात्रे, रामा म्हात्रे, संतोष म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, देवीचंद भोय, चंद्रकांत भोय, शांताबाई म्हात्रे आदी शेतकऱ्यांचा समावेश आहे. (वार्ताहर)