सुवर्ण मंदिर धरतीवर चवदार तळ्याचे पाणी होणार शुद्ध

By राजेश भोस्तेकर | Published: March 20, 2023 11:19 AM2023-03-20T11:19:55+5:302023-03-20T11:21:11+5:30

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबडकर यांना केले अभिवादन

water of the tasty lake will be pure on the basis golden temple cm eknath shinde assured | सुवर्ण मंदिर धरतीवर चवदार तळ्याचे पाणी होणार शुद्ध

सुवर्ण मंदिर धरतीवर चवदार तळ्याचे पाणी होणार शुद्ध

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : सूवर्ण मंदिराच्या धर्तीवर चवदार तळ्यासाठी देखील पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाड येथे चवदार तळे येथे दिली आहे.

चवदार तळे सत्याग्रह दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दि.19 मार्च रोजी रात्री उशिरा महाड येथील चवदार तळ्याला भेट दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. चवदार तळे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत ते बुद्धवंदनेत सहभागी झाले होते.    
        
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, बार्टीचे महासंचालक धम्माज्योती गजभिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नामदे, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार श्रीमती दीप्ती देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: water of the tasty lake will be pure on the basis golden temple cm eknath shinde assured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.