भिरा धरणातून सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 02:10 AM2018-07-17T02:10:04+5:302018-07-17T02:10:18+5:30
जयंत धुळप
अलिबाग: गेल्या चोवीस तासांत रायगड जिल्ह्यातील गिरिस्थान माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक २६२ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे २९८ मि.मी. पाऊस झाल्याने महाडच्या सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली. तसेच भिरा धरणाची पातळी ९५.०८ मीटर झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणाचे तीन दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले. हा विसर्ग दुपारी एक वाजता १०४ क्यूसेक्स होता, तर दुपारी तीन वाजता अरबी समुद्रास असणारी भरती आणि संभाव्य उसळणाऱ्या मोठ्या लाटा अशी एकाच वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सावित्री आणि कुंडलिका नदी किनारच्या गावांमध्ये काहीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. परंतु भरतीचा आणि पावसाचा जोर तुलनात्मकदृष्ट्या कमी राहिल्याने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नाही आणि प्रशासनासह सर्वांनी नि:श्वास टाकला.
दहा तालुक्यांत होता पावसाचा जोर
दरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी पोलादपूर-१२५ मि.मी., पेण-१२० मि.मी.,पनवेल-११९ मि.मी.,कर्जत-९३ मि.मी.,माणगांव-८५ मि.मी., म्हसळा-७५ मि.मी., खालापूर-६४ मि.मी., महाड-६४ मि.मी., तळा-६१मि.मी. ,रोहा-५७ मि.मी. या ठिकाणी पावसाचा जोर होता. मात्र श्रीवर्धन-४२मि.मी., अलिबाग २९ मि.मी., मुरु ड-१६ मि.मी., उरण-२५ मि.मी., सुधागड-३८ मि.मी. या ठिकाणी पावसाचा जोर कमी होता.
दुपारी वाढलेली नद्यांची जलपातळी संध्याकाळी नियंत्रणात
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलपातळीत दुपारी झालेली वाढ संध्याकाळी पाच वाजता मात्र कमी आली असून सद्यस्थितीत नद्यांची जलपातळी प्रत्यक्ष (धोकापातळी)मीटरमध्ये कुंडलिका नदी-२३.५०(२३.९५), अंबा नदी -७(९), सावित्री नदी -६.१०(६.५०), पाताळगंगा - १९(२१.५२), उल्हास नदी - ४५.४०(४८.७७), गाढी नदी - ३(६.५५) अशी असल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
>रसायनीत वादळी वाºयाने जनजीवन विस्कळीत
मोहोपाडा : रसायनी व आसपासच्या परिसरात सोमवारी पहाटेपासूनच दुपारपर्यंत सुरू असलेल्या वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यावेळी परिसरात ठिकठिकाणी जुनाट वृक्ष उन्मळून पडले तर आसपासच्या परिसरात काही भागात घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. तसेच मोहोपाडा-पराडे या रस्त्यावर काही वृक्ष उन्मळून पडले. यावेळी रस्त्याशेजारील दुकानाचे नामफलक कोसळले, तर काही ठिकाणी घरावरील पत्रे, ताडपत्रीचे मांडव कोसळून पडले.
मोहोपाडा येथील एचओसी वसाहतीत श्री साईबाबा मंदिराकडे जाणाºया रस्त्यावर दोन भलेमोठे जुनाट वृक्ष उन्मळून पडल्याने एचओसी कॉलनीतून मोहोपाडाकडे जाणारी रहदारी बंद होती. हे जुनाट वृक्ष वीजवाहिनीवर आल्याने वीज मंडळाच्या कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. वादळी वाºयाने परिसरात ठिकठिकाणी नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
>पावसामुळे वाहतूक ठप्प, घरांची पडझड
दरम्यान, सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे, गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर येथे महामार्गावर झाड पडल्याने वाहतूक मंदावली होती. मात्र झाड तत्काळ हटविण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. महाड येथील दस्तुरी नाका ते नाते खिंड रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती.
म्हसळा तालुक्यातील देवघर कोंड येथील काशिनाथ गिजे यांच्या घराचा काही भाग पावसाने कोसळून नुकसान झाले, मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. म्हसळा तालुक्यातच तुरु ंबाडी येथील गजानन गोया कोळी यांच्या घराचे सर्व पत्रे पाऊस आणि वादळी वाºयामुळे उडाल्याने घराचे नुकसान झाले आहे, मात्र जीवित हानी झालेली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.