शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भिरा धरणातून सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:10 AM

जयंत धुळप अलिबाग: गेल्या चोवीस तासांत रायगड जिल्ह्यातील गिरिस्थान माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक २६२ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे २९८ मि.मी. पाऊस झाल्याने महाडच्या सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली. तसेच भिरा धरणाची पातळी ९५.०८ मीटर झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणाचे तीन दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले. हा विसर्ग दुपारी एक ...

जयंत धुळप अलिबाग: गेल्या चोवीस तासांत रायगड जिल्ह्यातील गिरिस्थान माथेरान येथे जिल्ह्यातील सर्वाधिक २६२ मि.मी. पावसाची नोंद झाली. तर, महाबळेश्वर येथे २९८ मि.मी. पाऊस झाल्याने महाडच्या सावित्री नदीच्या पातळीत वाढ झाली. तसेच भिरा धरणाची पातळी ९५.०८ मीटर झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव धरणाचे तीन दरवाजे उघडून पाणी सोडावे लागले. हा विसर्ग दुपारी एक वाजता १०४ क्यूसेक्स होता, तर दुपारी तीन वाजता अरबी समुद्रास असणारी भरती आणि संभाव्य उसळणाऱ्या मोठ्या लाटा अशी एकाच वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सावित्री आणि कुंडलिका नदी किनारच्या गावांमध्ये काहीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. परंतु भरतीचा आणि पावसाचा जोर तुलनात्मकदृष्ट्या कमी राहिल्याने कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली नाही आणि प्रशासनासह सर्वांनी नि:श्वास टाकला.दहा तालुक्यांत होता पावसाचा जोरदरम्यान, जिल्ह्यातील उर्वरित ठिकाणी पोलादपूर-१२५ मि.मी., पेण-१२० मि.मी.,पनवेल-११९ मि.मी.,कर्जत-९३ मि.मी.,माणगांव-८५ मि.मी., म्हसळा-७५ मि.मी., खालापूर-६४ मि.मी., महाड-६४ मि.मी., तळा-६१मि.मी. ,रोहा-५७ मि.मी. या ठिकाणी पावसाचा जोर होता. मात्र श्रीवर्धन-४२मि.मी., अलिबाग २९ मि.मी., मुरु ड-१६ मि.मी., उरण-२५ मि.मी., सुधागड-३८ मि.मी. या ठिकाणी पावसाचा जोर कमी होता.दुपारी वाढलेली नद्यांची जलपातळी संध्याकाळी नियंत्रणातजिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या जलपातळीत दुपारी झालेली वाढ संध्याकाळी पाच वाजता मात्र कमी आली असून सद्यस्थितीत नद्यांची जलपातळी प्रत्यक्ष (धोकापातळी)मीटरमध्ये कुंडलिका नदी-२३.५०(२३.९५), अंबा नदी -७(९), सावित्री नदी -६.१०(६.५०), पाताळगंगा - १९(२१.५२), उल्हास नदी - ४५.४०(४८.७७), गाढी नदी - ३(६.५५) अशी असल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.>रसायनीत वादळी वाºयाने जनजीवन विस्कळीतमोहोपाडा : रसायनी व आसपासच्या परिसरात सोमवारी पहाटेपासूनच दुपारपर्यंत सुरू असलेल्या वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यावेळी परिसरात ठिकठिकाणी जुनाट वृक्ष उन्मळून पडले तर आसपासच्या परिसरात काही भागात घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. तसेच मोहोपाडा-पराडे या रस्त्यावर काही वृक्ष उन्मळून पडले. यावेळी रस्त्याशेजारील दुकानाचे नामफलक कोसळले, तर काही ठिकाणी घरावरील पत्रे, ताडपत्रीचे मांडव कोसळून पडले.मोहोपाडा येथील एचओसी वसाहतीत श्री साईबाबा मंदिराकडे जाणाºया रस्त्यावर दोन भलेमोठे जुनाट वृक्ष उन्मळून पडल्याने एचओसी कॉलनीतून मोहोपाडाकडे जाणारी रहदारी बंद होती. हे जुनाट वृक्ष वीजवाहिनीवर आल्याने वीज मंडळाच्या कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. वादळी वाºयाने परिसरात ठिकठिकाणी नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.>पावसामुळे वाहतूक ठप्प, घरांची पडझडदरम्यान, सोमवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासात झालेल्या पावसामुळे, गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर येथे महामार्गावर झाड पडल्याने वाहतूक मंदावली होती. मात्र झाड तत्काळ हटविण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे. महाड येथील दस्तुरी नाका ते नाते खिंड रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ बंद झाली होती.म्हसळा तालुक्यातील देवघर कोंड येथील काशिनाथ गिजे यांच्या घराचा काही भाग पावसाने कोसळून नुकसान झाले, मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. म्हसळा तालुक्यातच तुरु ंबाडी येथील गजानन गोया कोळी यांच्या घराचे सर्व पत्रे पाऊस आणि वादळी वाºयामुळे उडाल्याने घराचे नुकसान झाले आहे, मात्र जीवित हानी झालेली नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Raigadरायगड