पेण : देशामधील सर्वात जास्त ४० टक्के धरणं महाराष्ट्रात आहेत. पण आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोकणची जलसंपत्ती त्यामानाने चांगली आहे. ही अधिक भक्कम करण्यासाठी पडणाऱ्या पावसाचा थेंबन्थेंब अडवून तो जमिनीत जिरवायचा असेल तर त्यासाठी गावकऱ्यांनी, युवा-युवतींनी, विद्यार्थ्यांनी या कामांसाठी स्वत:हून तयार व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन विश्व जलशांती यात्रा अंतर्गत कोकण परिक्रमेचे मुख जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पेण येथील कार्यक्रमप्रसंगी केले.कोकणात उपजत आढळणारी जैवविविधता, दरवर्षी ३०७० मिमीपेक्षा जास्त पडणारा पाऊस, डोंगरदऱ्यांच्या विस्तीर्ण रांगा, लालबुंद माती, ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून, निसगाने कोकणावर कृपादृष्टी केली असतानाही कोकणात मागासलेपणा कायम आहे. चांगला पाऊस पडूनसुद्धा वाया जाणाऱ्या पावसाचे पाणी अडविण्यावर आजपर्यंत भर दिला नाही, असे राजेंद्र सिंह म्हणाले. जंगल, जमीन, प्राणी हे तीन नैसर्गिक घटकांचे महत्त्व मानवी जीवनासाठी आवश्यक आहे. भौतिक श्रीमंतीच्या मागे धावाल तर अपणच आपले अहित करतो याचे भान ठेवा. नैसर्गिक घटकांचे संरक्षण करण्याची शपथ घ्या, यातूनच कोकणची प्राकृतिक संपदा बहरेल व त्या अनुषंगाने जगातले अनेक देशोदेशींचे पर्यटक कोकणला, येथील नैसर्गिक वनसंपदेला भेटी देतील. त्यातूनच गावातच तुम्हाला आर्थिक समृद्धीचा भक्कम स्रोत उपलब्ध होईल, असे वक्तव्य डॉ. राणा यांनी केले.कोकण जलपरिक्रमेंतर्गत जलचेतना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन पेणच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयातर्फे करण्यात आले होते. यावेळी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राजेंद्रसिंह यांनी राजस्थान व कोकण यांच्यामधील प्राकृतिक परिभाषा उलगडून फरक स्पष्ट क रताना कोकणातील प्राकृतिक संपदा अनुकूल असूनसुद्धा गावे ओस पडली, लोक शहराकडे गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. नव्या पिढीने शेतीचे ज्ञान घेतले नाही, त्यामुळे चंगळवादात वाढला आहे.यावेळी कोकण परिक्रमेचे प्रमुख संजय यादव, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, बापूसाहेब नेने, डॉ. गोडबोले आदी उपस्थित होते.
जलसंपत्ती भक्कम करणे आवश्यक
By admin | Published: January 16, 2016 12:28 AM