पावसामुळे उरणमधील रस्त्यांवर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 12:06 AM2020-07-28T00:06:15+5:302020-07-28T00:06:25+5:30

रविवारी रात्रीपासून सतत कोसळणाºया मुसळधार पावसाने उरणकरांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते.

Water on roads in Uran due to rains | पावसामुळे उरणमधील रस्त्यांवर पाणी

पावसामुळे उरणमधील रस्त्यांवर पाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
उरण : रविवारी दुपारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने उरणकरांना झोडपून काढले. उरण शहर आणि परिसरातील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. शहरातील काही घरांतही पावसाचे पाणी शिरले आहे. मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. पावसाअभावी शेतकरी हैराण झाले होते, त्यांना मात्र दिलासा मिळाला आहे.
रविवारी रात्रीपासून सतत कोसळणाºया मुसळधार पावसाने उरणकरांची चांगलीच तारांबळ उडवली आहे. उरण शहरातील बोरी-शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. वैष्णवी हॉटेल, आपला बाजार, साठे हॉटेल, गणपती चौक, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. शहरातील काही घरांतही पावसाचे पाणी शिरले आहे.
उरण परिसरातील जेएनपीटी- नवघर, द्रोणागिरी आणि परिसरातील काही रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे मात्र, वाहन चालकांना वाहने चालविणे कठीण होऊन बसले
होते.
मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी शेतकरी मात्र सुखावला आहे. उष्म्यामुळे घामाघूम झालेल्या नागरिकांनाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
पनवेलमध्ये पावसाची संततधार
च्पनवेल : दिवसभरात संपूर्ण तालुक्यात ७० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. पनवेलमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना या पावसाचा त्रास झाला नसला, तरी मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी साचले होते.
च्सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला. दरम्यान, तालुक्यातील गाढी, कसाडी या नद्या ओसंडून वाहत असल्याचे पाहावयास मिळाले. तालुक्यात एक-दोन ठिकाणी झाडे उन्मळून पडली. या व्यतिरिक्त कुठेही मोठी हानी झाली नाही. सायन-पनवेल, कळंबोली-मुंब्रा, मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले.

Web Title: Water on roads in Uran due to rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.