शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

रोहा तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट

By admin | Published: March 19, 2017 5:36 AM

रोहा तालुक्यात दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत येथील बहुतांश भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे

रोहा : रोहा तालुक्यात दरवर्षी मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत येथील बहुतांश भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत असतात. तीव्र उष्णतेमुळे तालुक्यावर पाणीटंचाईचे संकट कोसळत असल्याने या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाईग्रस्त गाव व वाड्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती मूळ आराखडा तयार केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा आराखडा प्रस्ताव मंजुरीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. मात्र, पुढील कार्यवाही अद्याप प्रलंबित असल्याने यंदाच्या संभाव्य पाणीटंचाई आराखडा प्रस्तावावर शासनाकडून पाणी तर फिरणार नाही ना? अशी भीती टंचाईग्रस्त भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.रोहा तालुक्यात उन्हाळी पाणीटंचाईची झळ आतापासून बसू लागली आहे. उन्हाळ्यात नगरपालिका हद्दीत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या अनेक भागांत २ ते ३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने भयानक दृश्य दिसून येत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. निवडणुकीत आश्वासनांची बरसात करणारे पुढारी मात्र पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिलांची पाणीसमस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. डोंगर दुर्गम भागात राहणाऱ्या महिला सार्वजनिक विहिरींचा वापर करताना दिसतात, तर काही जण कुंडलिकानदी व कालवा भागातून वाहनाद्वारे (बैलगाडी) ग्रामीण भागात पाणीपुरवठा करीत असल्याचे दृश्य रोह्यात दिसून येत आहे.रोहे तालुक्यात मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती मूळ आराखडा गोषवारा तयार असून, तालुक्यातील (उसर) ठाकूरवाडी, (पिंगळसई) साळवी वाडा, (वरवडे) बौद्धवाडी, सोनगाव, धामणसई, गावठाण, (धामणसई) बौद्धवाडी, (भालगाव) फणसवाडी अशी एकूण ३ गावे व ५ वाड्यांवर असणाऱ्या २३८१ लोकांकरिता टँकरद्वारे पाणीपुरवठा होणार आहे. याकरिता अंतर्गत ४ लाख ८० हजार खर्च होणार आहे. या संभाव्य पाणीटंचाई संदर्भात रोहा पंचायत समिती कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांना अद्याप वेळ मिळत नसल्याने या प्रस्तावाची फाइल पुढे सरकत नाही. दरवर्षी येथील दुर्गम भागांना पंचायत समितीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असतो. अर्थातच, किमान जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतच याकामाचे आदेश प्राप्त होत असतात; परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींमुळे यंदा या कामाला उशीर झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आदेश येताच नियोजित गावे व वाड्यांना पाणी देण्यात येईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. (वार्ताहर)पाणीटंचाई कृ ती आराखडा सादर के ला आहे. आता पाहणी अहवाल देणे आहे. सध्या तरी उसर ठाकू रवाडी येथे भीषण पाणीटंचाई आहे. तेथे हातपंप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुढे एप्रिलमध्ये परिस्थिती पाहून पुरवणी आराखडा सादर के ला जाईल. जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानंतर रोहा तहसीलदारांनी उपलब्ध करून दिलेल्या टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात येईल.- बी. टी. जायेभाये, गटविकास अधिकारी, रोहा