शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

जिल्ह्यात ५५० गावांत पाणी योजना यशस्वी; लोकवर्गणी आणि श्रमदानामुळे अचूक नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 4:05 AM

रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन, तळा या सहा तालुक्यांतील १८५ ग्रामपंचायतींमधील ५५० गावांमध्ये पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या आहेत.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, श्रीवर्धन, तळा या सहा तालुक्यांतील १८५ ग्रामपंचायतींमधील ५५० गावांमध्ये पाणीपुरवठा योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून २९ हजार ९५३ घरांना व १ लाख ५० हजारपेक्षा अधिक ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठीची वर्षानुवर्षांची पायपीट आता थांबल्यामुळे या सर्व गावांतील महिलावर्ग सुखावला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध समस्या सोडविण्याच्या हेतूने ‘स्वदेस फाउंडेशन’ या अशासकीय स्वयंसेवी संस्थेमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक घरामध्ये वर्षभर स्वच्छ व पुरेसे पिण्यायोग्य पाणी नळाद्वारे पुरविणे,गाव पातळीवरील पाण्याचे नियोजन व बळकटीकरण करण्यासाठी पाणी समितीची स्थापना करणे व सक्षमीकरण करणे आणि शासकीय व उपलब्ध साधनसामग्री आणि स्रोताचा योग्यरीत्या वापर करणे अशी तीन उद्दिष्टे प्रकल्पाची आहेत.पाणी प्रकल्पासाठी ग्रामस्थांचा विनंती अर्ज प्राप्त होताच, स्वदेस टीम संपूर्ण गावाची सभा घेवून पाणी प्रकल्पाच्या रचनेची माहिती ग्रामस्थांना दिली जाते. प्रत्येक घराला किमान २०० लिटर स्वच्छ पाणी दर दिवशी नळाद्वारे पुरविणे हा मुख्य उद्देश ठेवून प्रकल्पाची रचना करण्यात येते. तज्ज्ञ अभियंत्यांकडून गावातील अस्तित्वात असणाऱ्या व परिसरातील पाणी स्रोताचे सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने सर्वेक्षण करण्यात येते. त्यानंतर पाणी प्रकल्प आराखडा तयार करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी विहीर, बोअरवेल, झºयाचे बांधकाम, साठवण टाकी, प्रत्येक घरामध्ये नळ कनेक्शन, गरजेनुसार पाणी उपसण्यासाठी सौर पंप अशा प्रकारची कामे सुचविण्यात येतात. आराखड्यामध्ये सुचविलेल्या उपायाची माहिती ग्रामस्थांना देण्यात येते. ग्रामस्थांच्या संमतीने कोणत्या प्रकारची कामे करायची हे ठरवून आणि जागा मालकाची ना हरकत घेऊन काम केले जाते. नवीन पाणी योजनेसाठी प्रत्येक कुटुंबाकडून ४ हजार रुपये तर आदिवासी व धनगर कुटुंबाकडून ५०० रु पये लोकवर्गणी घेण्यात येते. फक्त नळ कनेक्शन करायचे असल्यास २ हजार रुपये वर्गणी घेण्यात येते. प्रकल्प अंमलबजावणीसाठी महिलांच्या सहभागासह पाणी समिती स्थापना करण्यात येते. प्रकल्प पूर्व आणि प्रकल्प पश्चात प्रशिक्षण देण्यात येते. सर्व ना हरकत दाखले व लोकवर्गणी स्वदेसकडे आल्यानंतर ठेकेदार नियुक्तीनंतर काम सुरु होते. समिती सदस्य देखरेख करतात. मुख्य पाइपलाइनपासून घरापर्यंतच्या पाइपलाइनसाठी ग्रामस्थ श्रमदान करतात. ग्रामस्थ श्रमदान करून साहित्याची वाहतूक करतात. पाणी प्रकल्प झाल्यावर तीन महिने देखभाल दुरुस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पाणी समिती आणि ग्रामस्थांची असते. पाणी साठवण टाकीजवळच पाणी शुद्धीकरण सयंत्र बसविण्यात येते. स्वदेसने राबवण्यात आलेल्या योजनामध्ये ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असतो व यामुळेच पाणी प्रकल्प यशस्वी होत आहेत. काही प्रकल्पामध्ये पाणी स्रोताची कमतरता असल्यामुळे इतर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुनर्सर्वेक्षण करून पाणी समस्या सोडवण्यात येत आहे.१९ गावांत सौरऊर्जेवर चालणारे पंपविजेच्या जोडणीच्या समस्येवर मात करण्यासाठी १९ गावांत स्वदेसने अतिरिक्त खर्च करून सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवून पाणीपुरवठा योजना राबवली आहे. स्वदेसचे विश्वस्त रॉनी स्क्रूवाला व झारिना स्कू्रवाला यांनी प्रकल्प यशस्वी झालेल्या गावांत जावून ग्रामस्थांचे कौतुक केले आहे. स्वदेसने राबवण्यात आलेल्या योजनामध्ये ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग असतो व यामुळेच पाणी योजना यशस्वी होत आहेत. दक्षिण रायगडमध्ये पाणीटंचाई असणाºया गावांनी स्वदेसजवळ संपर्क साधून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन स्वदेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी केले आहे.

टॅग्स :Waterपाणी