शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

नियोजनाअभावी पाणीटंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 12:11 AM

देखभालीकडे दुर्लक्ष : सुधागड तालुक्यात पाच धरणे, तरी पाणीटंचाई कायम

-विनोद भोईर

पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील अंबा नदीचे पाणी पहिल्यांदा कमालीचे घटले आहे. त्यामुळे पालीकरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नियोजनाअभावी पालीकरांवर पाणीटंचाईचे सावट आले आहे.

पालीला अंबा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. दर वर्षी उन्हाळ्यातही नदीला मुबलक पाणी असते, त्यामुळे केवळ मोटार पंप बिघडल्यास, वाहिन्या तुटल्यास, दुरुस्ती असल्यास अनियमित पाणीपुरवठा होतो. मात्र, यंदा पहिल्यांदा अंबा नदीची पाणीपातळी कमालीची घटली आहे. उन्हाळ्यात नदीला येथील जवळच असलेल्या उन्हेरे व कवेळे धरणातून नियमित पाणी मिळते. मात्र, उन्हेरे धरणाची जॅकवेल पूर्णपणे मोडल्याने धरण आटले आहे. तसेच कवेळे धरणालादेखील गळती लागली आहे. याकडे पाटबंधारे विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. यामुळे नदीचे मुख्य स्रोतच संपुष्टात आले. परिणामी, शासकीय अनास्थेमुळे पालीकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या पाणी घटल्याने जॅकवेलमधील मोटार पंप वर दिसत आहेत. पाणी ओढल्यानंतर पुन्हा नदीत पाणी भरण्यास वेळ लागतो.

सुधागड तालुक्यातील धरणाची अवस्था दयनीयच्तालुक्यात उन्हेरे, कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत आणि कवेळे ही पाच मोठी धरणे आहेत. त्यातील उन्हेरे धरणाची जॅकवेल मागील तीन वर्षांपासून मोडकळीस आली होती. अखेर ती आता पूर्णपणे ढासळली. तसेच डागडुजीअभावी हे धरण मरणासन्न अवस्थेत आहे. कवेळे धरणालाही गळती लागली आहे. तर कोंडगाव, घोटवडे, ढोकशेत धरणाच्या कालव्याच्या बंदिस्त नलिकांमध्ये (पाइपलाइन डिस्ट्रिब्युशन नेटवर्क) शेवाळ, मुळ्या, घाण व कचरा जाऊन त्यांच्यात बिघाड झाला आहे. उन्हेरे धरणाची वेळीच दुरु स्ती केली असती तर पालीकरांना टंचाईला सामोरे जावे लागले नसते. या संदर्भात अनेक वेळा बातम्यांच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

पाण्यासाठी अजून थोडे थांबाच्कवेळे, ढोकशेत व कोंडगाव धरणाचे पाणी अंबा नदीला सोडण्यासाठी पाली ग्रामपंचायतीतर्फे कोलाड येथील पाठबंधारे विभागाला निवेदन देण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने या संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, काही अंतर दूरवर असलेल्या धरणातून पाणी सोडल्यावर ते पहिल्यांदा इतर कालव्यांना जाईल, मग नाले व ओहळ आणि त्यानंतर नदीला मिळेल. यासाठी जवळपास १० -१२ दिवस जातील. परिणामी, तोपर्यंत पालीकरांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. 

ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व उपाय करत आहोत. धरणाचे पाणी येईपर्यंत नदीला काही अंतरावर चर खोदून पुढील पाणी घेण्यात येईल. जेणेकरून पाणीसाठा वाढेल. नागरिकांनीदेखील थोडे दिवस पाणी जपून वापरून सहकार्य करावे.- गणेश बाळके, सरपंच,ग्रुप ग्रामपंचायत पाली

टॅग्स :Raigadरायगड