कर्जत तालुक्यात पाणीटंचाई, १७ गावे, ५९ वाड्यांना टँकरची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 01:16 AM2020-05-02T01:16:53+5:302020-05-02T01:17:03+5:30

या कृती समितीचे काम कोरोनामुळे झालेले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील लोकांचे लक्ष शासकीय टँकरकडे लागून राहिले आहे.

Water shortage in Karjat taluka, 17 villages, 59 wadis waiting for tanker | कर्जत तालुक्यात पाणीटंचाई, १७ गावे, ५९ वाड्यांना टँकरची प्रतीक्षा

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई, १७ गावे, ५९ वाड्यांना टँकरची प्रतीक्षा

googlenewsNext

विजय मांडे
कर्जत : तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग असून या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तालुका पाणीटंचाई निवारण कृती आराखडा तयार करून तालुक्यातील १७ गावे आणि ५९ वाड्या टंचाईग्रस्त घोषित करण्यात आल्या आहेत. या कृती समितीचे काम कोरोनामुळे झालेले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त भागातील लोकांचे लक्ष शासकीय टँकरकडे लागून राहिले आहे.
कर्जत तालुका हा आदिवासीबहुल तालुका असून, भौगोलिक रचनेमुळे उन्हाळा सुरू झाला की पाण्याची समस्या निर्माण होते. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक हे दुर्गम भागात राहतात. दरवर्षी त्यांना पाणीटंचाईच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागातील लोकांना उन्हाळ्यात टँकरने पाणी पुरविण्याची वेळ शासनावर येत असते. मागील वर्षी ५० हून अधिक गावे आणि आदिवासी वाड्यांना शासकीय टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात आले होते. यंदाच्या आराखड्यात तालुक्यातील १७ गावे आणि ५९ वाड्या पाणीटंचाईग्रस्त आहेत. या सर्व ७६ गाव-वाड्यांना शासकीय टँकरच्या माध्यमातून मार्च ते मे या कालावधीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. त्यासाठी ६८ लाख रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. पाणीटंचाई निवारण कृती समितीने तालुक्यातील काही नादुरुस्त नळपाणी योजनांची दुरुस्ती करण्याचे ठरविले असून जास्त पाणीटंचाई असलेल्या ठिकाणी विंधन विहिरी खोदल्या जाणार आहेत. ज्या विंधन विहिरी नादुरुस्त आहेत, त्यांचीदेखील दुरुस्ती केली जाणार आहे. नवीन प्रस्तावदेखील मंजूर के ले आहेत.
टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी मार्चपासून होणार होती. मात्र एप्रिल महिना संपायला आला असतानाही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.
>कृ ती आराखड्यानुसारपाण्याची गरज असणारी गावे, वाड्या
पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यानुसार कर्जत तालुक्यातील १७ गावांत टँकरने पाणी पुरविले जाणार आहे. त्यात मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, भुतिवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, अंथरट वरेडी, चेवणे, मोहोपाडा, भोपळेवाडी, नांदगाव, ढाक, तुंगी, पेठ, अंथरट निड या गावांचा समावेश आहे.
५८ वाड्या पाणीटंचाईग्रस्त असून, त्यात आनंदवाडी, भगताची वाडी, भक्ताची वाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटरवाडी, काटेवाडी, चाफेवाडी, मोरेवाडी, वडाची वाडी, टेपाची वाडी, पाली धनगर वाडा, आसल धनगरवाडा, सागाची वाडी, कळंब बोरीची वाडी, भुतिवलीवाडी, धामणदांड, चिंचवाडी, मिरचुलवाडी, काळेवाडी, आसलवाडी, नाण्यांचा माळ, ताडवाडी, बनाची वाडी, आषाणे ठाकूरवाडी, जांभूळवाडी वारे, सुतारपाडा, भागूची वाडी, भागूची वाडी - २, किरवली ठाकूरवाडी, सावरगाव ठाकूरवाडी, विकासवाडी, ठोंबरवाडी, हऱ्याची वाडी, गरुडपाडा, विठ्ठलवाडी, मेंगाळवाडी, तेलंग वाडी, कोतवाल वाडी, ढाक कळकराई, मिरचोली, माणगाव ठाकूरवाडी खांडपे, स्टेशन ठाकूरवाडी, नवसूची वाडी, वारे जांभूळवाडी, खाडेपाडा आदिवासी वाडी, चहूची वाडी, मिरचोलवाडी, नारळेवाडी, मेंगाळवाडी ठाकूरवाडी, नांदगाव विठ्ठलवाडी, दामत कातकरवाडी यांचा
समावेश आहे.

Web Title: Water shortage in Karjat taluka, 17 villages, 59 wadis waiting for tanker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.