रोहे : अष्टमी मोहल्ला विभागातील नागरिकांना भरपावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असल्याने स्थानिक महिलांनी सोमवारी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांची भेट घेतली व आपले गाºहाणे मांडले. सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाणी मिळावे याकरिता पोलीस बंदोबस्तात पाणी चोरट्यांवर यापुढे कारवाई करणार, असा इशारा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी दिला.अष्टमी मोहल्ला विभागात गेली कित्येक दिवस पाणीटंचाईमुळे नागरिक विशेषत: महिलावर्ग त्रस्त आहे. वार्षिक पाणीपट्टी भरत असताना नागरिक आपल्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत. पाण्याचा विषय गंभीर असून लोकांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे, अशी मागणी माजी नगरसेवक अल्ताफ चोरडेकर यांनी केली, तर मोहल्ला विभागातील महिलांनी पाणी समस्येचा पाढा वाचला. त्याचप्रमाणे या भागातील सार्वजनिक शौचालय, गटारांची स्वच्छता, रस्ते साफसफाई, घनकचरा व अन्य विषयावर चर्चा करण्यात आली.सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी चोरट्यांवर सक्त कारवाई करण्याचा ठराव घेण्यात आला. यापुढे नगरपालिका पोलीस बंदोबस्तात पाणी चोरट्यांवर कारवाई करणार आहे. बेकायदेशीर विद्युत पंपाचा वापर सर्रासपणे होत असल्याने या भागातील काही लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विद्युत पंपाचा वापर करून पाणी चोरताना आढळून आल्यास प्रथम ५ हजार, दुसऱ्यांदा १0 हजार तर तिसºयांदा पाणी चोरणाºयाचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येईल व दंडाची रक्कम न भरल्यास मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे, असा ठराव पारित करण्यात आल्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी दिली. याविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सर्व ठिकाणी होर्डिंग, बॅनर्स, हॅण्डबिल वाटप करणार आहेत.
पावसाळ्यातही अष्टमीत पाणीटंचाई; पोलीस बंदोबस्तात होणार पाणी चोरांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 3:11 AM