- वैभव गायकरपनवेल - पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. देहरंग धरण आटले असून, पाण्यासाठी एमजेपीसह इतर आस्थापनांवर अवलंबून राहावे लागत आहे. शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी रोज २१० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे; पण प्रत्यक्षात ५२ एमएलडी पाणीच उपलब्ध होत असून, टँकरसह बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.पनवेल शहरात दिवसेंदिवस पाण्याची समस्या आणखीन बिकट होत चालली आहे. शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करूनही पालिकेच्या माध्यमातून मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने शहरात पाण्याअभावी नागरिकांचे हाल सुरू आहेत. ग्रामीण भागात परिस्थिती आणखीनच बिकट आहे. खारघर, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल आदी ठिकाणी सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो, तर तळोजा एमआयडीसीमध्ये एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहरात पालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणातून, एमजेपी, एमआयडीसी आदी ठिकाणांहून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी एमआयडीसी पाच व एमजेपी ११ एमएलडी अशा स्वरूपात पाणीपुरवठा करते, तर देहरंग धरणाने तळ गाठल्याने आठवड्यातून केवळ एकदाच महानगर पालिका घेते, अशी माहिती पाणीपुरवठा अधिकारी रामदास तायडे यांनी दिली. देहरंग धरणातील पाणीसाठा कोणत्याही क्षणी संपुष्टात येऊ शकतो. पाणीपुरवठा अतिशय कमी प्रमाणात होत असल्याने शहरातील नागरिकांना पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. शहरात २९ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. देहरंग धरणाने तळ गाठल्याने पालिकेला इतर प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पालिकेचे मुख्यालय असलेल्या पनवेल शहराला सर्वात मोठा अपुऱ्या पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील पाणीसमस्येमुळे नागरिकांचा उद्रेक होत आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने महानगरपालिकेच्या महासभेचे आयोजनही करता येत नाही.खारघर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदेश्वर, तळोजा एमआयडीसी शहरातील ग्रामीण भागातही हीच अवस्था असल्याने नजीकच्या काही दिवसांत ही समस्या आणखी बिकट होणार आहे. पनवेल शहरालगत असलेल्या सिडकोच्या कारंजाडे नोडमधील रहिवाशांचीही हीच बोंब आहे. पनवेल पालिकेने ठरविलेल्या टँकर धोरणानुसार पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाºया टँकरवर पनवेल महानगरपालिकेचे नाव ठळकपणे लिहिलेले असावे. मात्र, याबाबत पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. धोरणानुसार ठरवलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम टँकरमाफिया आकारत आहेत.बुस्टरपंपद्वारे पाणीचोरीखारघर शहरातही सध्याच्या घडीला अपुºया पाणीपुरवठ्याची समस्या वाढत चालली आहे. शहरात पाण्याची परिस्थिती बिकट असताना बुस्टरपंपद्वारे पाणीचोरी केली जात असल्याचा आरोप नगरसेविका नेत्रा पाटील यांनी सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. अशाप्रकारे बुस्टरपंपद्वारे पाणीचोरी केली जात असल्याने अनेक सोसायटीमध्ये पाण्याची कमतरता भासत आहे.बोअरवेलकडे नागरिकांचा कलशहरातील पाणीटंचाई पाहता अनेक रहिवाशांनी सोसायटीमध्ये नव्याने बोअरवेल सुरू केल्या आहेत. पालिकेवर अवलंबून न राहता पाणीटंचाई लक्षात घेता स्वत: पाणी स्रोतांची उपलब्धता करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.
देहरंग धरण आटले : पनवेलकरांच्या घशाला पडली कोरड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:33 AM