खारेपाटात पाणीटंचाईची समस्या

By admin | Published: March 22, 2017 01:36 AM2017-03-22T01:36:50+5:302017-03-22T01:36:50+5:30

यंदाच्या मान्सून हंगामात ४४४८ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद होऊन देखील पेणच्या वाशी, पडवळ खारेपाटात मार्चच्या मध्यावरच

Water shortage problem in saltwater | खारेपाटात पाणीटंचाईची समस्या

खारेपाटात पाणीटंचाईची समस्या

Next

पेण : यंदाच्या मान्सून हंगामात ४४४८ मि.मी. विक्रमी पावसाची नोंद होऊन देखील पेणच्या वाशी, पडवळ खारेपाटात मार्चच्या मध्यावरच पणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत.
पेण पंचायत समितीचा पाणीटंचाई कृती आराखडा सव्वा कोटीचा मंजूर केला असला तरीही सन २०१४-१५ या वर्षात खासगी टँकरचे ३५ लाख बाकी तर २०१५-१६ या वर्षातील ५ लाख बाकी मिळून ४० लाख रुपयांची खासगी टँकर मालकाची देणी आहेत. या वर्षीचा डेंजर झोन म्हणजे वाशी खारेपाटातील उत्तर शहापाडा योजनेतील पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अतिजीर्ण झाल्याने जलवाहिनीचा तळभाग गंजून निकामी झाल्याने पंधरा दिवसाआड जलवाहिनी फुटत आहे. गेल्या दोन दशकांत या समस्येवर प्रभावी उपाययोजना न केल्याने भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. यानंतरचे दोन महिने विकतच्या पाण्यावरच खारेपाटाला अवलंबून राहावे लागेल.
गेल्या दहा दिवसांपासून शहापाडा धरणातील पाणीसाठा संपल्याने हेटवणे धरणाच्या सिडकोच्या लाइनवरून शहापाडा उत्तर व दक्षिण योजनेतील गावांना पाणी सोडले जाते. या पाण्याचे वेळापत्रक तीन दिवसाआड असून पिण्याचे पाणी कमी दाबाने येत असल्याने मुख्य जलवाहिनीच्या प्रारंभीची गावेच या पाण्याचा लाभ घेतात. शेवटच्या गावांच्या घागरी रिकाम्याच राहतात. पाणी मिळत नाही म्हणून टँकर, टेम्पो यामध्ये प्रतिपिंप ७० ते ८० रुपये या दराने पाणी विकत घ्यावे लागते. पेण पंचायत समिती प्रशासन, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी कोणतीही तजवीज केलेली नाही. खासगी टँकर मालकांची गेल्या दोन वर्षांत ४० लाख रुपयांची देणी बाकी आहेत. जीपीएस यंत्रणेत वाडी वस्त्यावरचे मार्गावरचे पाणी टँकर यंत्रणेत दिसत नसल्याने शासनाकडून आलेले पैसे माघारी गेले. गतवेळच्या पेण पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी ही देणी जीपीएस यंत्रणेचा बडेजाव दाखवित न दिल्याने खासगी टँकरवाले आता पहिली बिले चुकती करा, नंतर टँकर देऊ, असे सांगत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Water shortage problem in saltwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.