जयंत धुळप
अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय तापमान वाढले आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते उष्म्याबरोबरच पाणीटंचाईमुळे प्रचाराला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळेही हैराण आहेत. उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारासाठी ज्या वेळी गावांमध्ये पोहोचतात, तेव्हा ग्रामस्थ विशेषत: महिलावर्ग, आधी पिण्याचे पाणी द्या, मग मते मागा असे सुनावत आहेत, अशा वेळी आचारसंहिता असल्याने काही करता येत नसल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेण्यात येत असल्याचे अनुभवास आले आहे.
रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, जिल्ह्यातील १९ गावे आणि ९१ वाड्यांवरील जलदुर्भिक्ष दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. कृती आराखड्याप्रमाणे हे पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. जनसामान्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या येऊ नये, यासाठी गावांची पाहणी करून टँकर्स किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याबाबत समितीची पुनर्रचना करण्याचे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ठरले होते. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची एक समिती जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी नियुक्त केली आहे.पेण तालुक्यात सर्वाधिक टंचार्ईग्रस्तच्टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या १९ गावे आणि ९१ वाड्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाईग्रस्त ११ गावे आणि ६२ वाड्या पेण तालुक्यात आहेत. या ११ गावांमध्ये वढाव, लाखोले, कान्होबा, मोठेभाल, विठ्ठलवाडी, शिक्र ी, ओढांगी, मसद बुद्रुक, मसदखुर्द, बोर्वे, बोर्झे यांचा समावेश असून पेण तालुक्यातील ६२ वाड्यांना टँकर्स अधिग्रहित करून पाणी देण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यात टंचार्ईग्रस्त गावे/वाड्याच्पोलादपूर तालुक्यात सात गावे आणि ११ वाड्या तीव्र पाणीटंचाईग्रस्त आहेत. पोलादपूरमधील सात गावांमध्ये चांभरगणी बुद्रुक, कालवली मोहल्ला, तुटवली, निवे, चांभरगणी खुर्द, कुडपण खुर्द, ताम्हाणे यांचा समावेश आहे, तर ११ टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये कालवली बौद्धवाडी, कालवली पवारवाडी, कालवली विठ्ठलवाडी, कालवली भोसलेवाडी, कालवली पाटीलवाडी, तुटवली धनगरवाडी, क्षेत्रपालळ धनगरवाडी, धनगरवाडी, क्षेत्रपालळ आमलेवाडी, किनेश्वरवाडी, ओबळी धनगरवाडी यांचा समावेश आहे.कर्जतमध्ये १७ वाड्या,तळा तालुक्यात १ वाडी तर मुरुडमध्ये १ गाव टंचाईग्रस्तच्कर्जत तालुक्यातील जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, चाफेवाडी, पादिरवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, धाबेवाडी आदी १७ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. तळा तालुक्यातील कुंभळेकोंड वाडी आणि मुरु ड तालुक्यातील एका गावाला टँकर्सद्वारे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.