ठाकूरवाडी स्टेशन परिसरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 06:54 AM2018-04-16T06:54:44+5:302018-04-16T06:54:44+5:30

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या दुर्गम भागातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पाण्याचे टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. तेथील महिलांना पाणी नेण्यासाठी कर्जत किंवा खंडाळा रेल्वेस्थानकात ट्रेन पकडून जावे लागते.

 Water shortage in Thakurwadi station area | ठाकूरवाडी स्टेशन परिसरात पाणीटंचाई

ठाकूरवाडी स्टेशन परिसरात पाणीटंचाई

Next

- संजय गायकवाड
कर्जत  - मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर असलेल्या दुर्गम भागातील स्टेशन ठाकूरवाडीमध्ये पाण्याचे टंचाईचे संकट अधिक तीव्र झाले आहे. तेथील महिलांना पाणी नेण्यासाठी कर्जत किंवा खंडाळा रेल्वेस्थानकात ट्रेन पकडून जावे लागते. तर काही लोकांना डोंगर उतरून कोंढाणे धरणात साचलेले पाणी आणण्यासाठी डोंगर उतरण्याची कसरत करावी लागते.
कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायतीमध्ये असलेले स्टेशन ठाकूरवाडी हे गाव १५० घरांची लोकवस्ती असलेले गाव. तेथील लोकांसाठी शासनाने दोन विहिरी पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून खोदल्या आहेत, त्या विहिरी जानेवारी महिन्यात आटल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांची पाण्यासाठी गेले तीन महिन्यांपासून दमछाक सुरू आहे. त्यातही एका विहिरीत नैसर्गिक झऱ्यातून काही हंडे पाणी साचत असल्याने ते पाणी घरटी मिळावे, यासाठी ग्रामस्थांनी नंबर लावून ठेवले आहेत. १५० घरांची वस्ती असल्याने आठवड्यातून दोनदा दोन हंडे पाणी एका कुटुंबाला त्या विहिरीवर मिळते.
वाडीत जाण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे मुंबई-पुणे रेल्वे. त्यातही काही ठरावीक गाड्यांना स्टेशन ठाकूरवाडी येथे टेक्निकल थांबा दिला आहे. मुंबई पुण्याला जाताना सकाळी दोन आणि सायंकाळी एक गाडी तेथे एक मिनिटे थांबतात. तर पुण्याकडून मुंबई जाणाºया दोन गाड्यांना तेथे टेक्निकल थांबा दिला आहे. अन्य पर्याय म्हणजे पायांना वाहन करत डोंगर उतरून परतावे लागते. याशिवाय स्टेशन ठाकूरवाडी येथील महिला पाण्यासाठी डोंगर उतरून कोंढाणे धरण गाठतात. साधारण एक तासभर चोची, मुंढेवाडी डोंगर उतरून पाणी शोधण्याचा असतो. कारण उल्हास नदीचे उगम असलेल्या त्या पात्रात फार तुरळक पाणी असते. अशा वेळी तेथे नदीपात्रात डवरे खोदून पाणी हंड्यात ओतावे लागते.

पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करण्याची वेळ आमच्यावर गावात सासरी म्हणून आल्यानंतर दुसºयाच दिवशी सुरू होते. आम्ही वयाचा विचार न करता पाण्याचे प्लास्टिक पिंप घेऊन घरातून बाहेर पडतो आणि पाणी घेऊन घरी पोहोचतो. ही आमचा दररोज दिनक्र म झाला आहे.
- आवडाबाई हिंदोळा, ग्रामस्थ

Web Title:  Water shortage in Thakurwadi station area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.