रायगड जिल्ह्यातील जलसाठा गेल्या वर्षा पेक्षा या वर्षी घटला, ६०.२८ टक्के पाणीसाठा उपलब्ध
By निखिल म्हात्रे | Published: February 19, 2024 08:33 PM2024-02-19T20:33:46+5:302024-02-19T20:34:13+5:30
गेल्या वर्षी ७७.३२ टक्के पाणी साठा उपलब्ध होता
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग: रायगड जिल्ह्यातील २८ धरण क्षेत्रात पाणीसाठा घटला आहे गेल्या वर्षी याच महिन्यात २८ धरण क्षेत्रात या वर्षापेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ६०.२८ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.तर मागील वर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ७७.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. अजूनही पुढील पावसाळा सुरू होण्यासाठी चार महिने शिल्लक आहेत.
रायगड जिल्ह्यातील पाणीसाठा कमी होत असताना उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाणीसाठा सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरून क्षेत्रात २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.तर रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील उसरण धरण क्षेत्रात सर्वाधिक ८१ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील दहा धरणात ५० टक्के पेक्षा कमी पाणी साठा उपलब्ध आहे.
रायगड जिल्ह्यात रायगड पाटबंधारे विभाग अंतर्गत २८ धरणे येत असून या २८ धरण क्षेत्राततील पाण्यासाठयामध्ये मुरुड तालुक्यातील फणसाड धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध,तळा तालुक्यातील वावा धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, रोहा तालुक्यातील सुतार वाडी धरण क्षेत्रात ७० टक्के पाणी साठा, पेण तालुक्यातील आंबेघर धरण क्षेत्रात ८० टक्के पाणी साठा उपलब्ध, अलिबाग तालुक्यातील श्रीगांव धरण क्षेत्रात ६२ टक्के पाणी साठा उपलब्ध, सुधागड तालुक्यातील कोंडगाव धरण क्षेत्रात ४५ टक्के पाणी साठा उपलब्ध, घोटवडे धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध, ढोकशेत धरणक्षेत्रात २० टक्के पाणी साठा उपलब्ध,कवेळे धरण क्षेत्रात ४७ टक्के पाणी साठा उपलब्ध,उन्हेरे धरण क्षेत्रात ४८ टक्के पाणी साठा उपलब्ध, श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले धरण क्षेत्रात ५८ टक्के पाणी साठा उपलब्ध, कुडकी धरण क्षेत्रात ७७ टक्के पाणी साठा उपलब्ध,रानीवली धरण क्षेत्रात ३९ टक्के पाणी साठा उपलब्ध,म्हसळा तालुक्यातील पाभरे धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, संदेरी धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, महाड तालुक्यातील वरंद धरण क्षेत्रात ५४ टक्के पाणी साठा उपलब्ध, खिंडवाडी धरण क्षेत्रात ५७ टक्के पाणी साठा उपलब्ध, कोथुर्डे धरण क्षेत्रात ४६ टक्के पाणी साठा उपलब्ध, खैरे धरण क्षेत्रात ४५ टक्के पाणी साठा उपलब्ध, कर्जत तालुक्यातील साळोख धरण क्षेत्रात ७१ टक्के पाणी साठा उपलब्ध,अवसरे धरण क्षेत्रात ५८ टक्के पाणी साठा उपलब्ध, खालापूर तालुक्यातील भिलवले धरण क्षेत्रात ७५ टक्के पाणी साठा उपलब्ध, कलोते मोकाशी धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध, डोणवत धरण क्षेत्रात ५७ टक्के पाणी साठा उपलब्ध,पनवेल तालुक्यातील मोरबे धरण क्षेत्रात ७६ टक्के पाणी साठा उपलब्ध,बामणोली धरण क्षेत्रात ७५ टक्के पाणी साठा उपलब्ध, उसरण धरण क्षेत्रात ८१ टक्के पाणी साठा उपलब्ध,उरण तालुक्यातील पुनाडे धरण क्षेत्रात ४७ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.