महिन्यापासून ३२ गावांचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:34 AM2020-01-04T00:34:40+5:302020-01-04T00:34:54+5:30

नागरिकांची पाण्यासाठी भटकंती; जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Water supply from 6 villages closed for the month | महिन्यापासून ३२ गावांचा पाणीपुरवठा बंद

महिन्यापासून ३२ गावांचा पाणीपुरवठा बंद

Next

- गिरीश गोरेगावकर 

माणगाव : गोरेगाव देवळी ३२ गाव योजना गेल्या महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे ३२ गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. या गावातील नागरिकांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागले आहे. ही योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठाअंतर्गत चालू आहे. मात्र, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, त्यामुळेच या ३२ गावांतील नागरिकांना पाणीपुरवठ्याची नामुष्की ओढावली आहे.
या योजनेअंतर्गत गोरेगावपासून देवळीपर्यंत आणि देवळीपासून वडपालेपर्यंत तर दुसºया बाजूकडे गोरेगावपासून बाकी-हुर्डी-काचले-टोलपर्यंत ही योजना २७ वर्षांपूर्वी पोहोचली आहे. ही योजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठाअंतर्गत चालू असून गेली दोन ते तीन वर्षे कागदावर चालू आहे खरी; मात्र वारंवार काहीना काही तांत्रिक कारणांनी बंद पडत असते. २७ वर्षांपूर्वी चालू झालेली योजना चांगली सुरू झाली; पण गेली काही वर्षे कधी पाइप फुटला, कधी पाइप जॉइंट लिक झाला, कधी वॉल लिकेज तर कधी मोटार बिघाड, अशा अनेक करणांमुळे बंद पडते. यामुळे या योजनेचा गावाला फायदा होत नाही. ही पाणीपुरवठा योजना गोरेगाव येथील काळ नदीच्या धारणावर वाढलेली आहे. ही योजना जुनी असल्याने संपूर्ण सिमेंट पाइप आहेत. त्यामुळे ते जीर्ण झालेली आहे. यामुळे या योजनेवर आधारित ३२ गावांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे.

एक महिना जास्त काळापासून तरी आमच्या गावाला पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आमच्या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. ही योजना गेली चार-पाच वर्षे सारखी बंद पडते आणि वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही लक्ष देत नाहीत.
- एकनाथ शिंदे, रहिवासी, काचले

काम चालू असून, गेल्या महिनाभरात दोन-तीन वेळा लिकेज काढले आहेत. कालही काँक्रीट टाकले आहे, आता चालू होईल. ही योजना जुनी झाली असून त्याची तोडफोड चालू आहे. या योजनेला रेनिवेशनची गरज आहे.
- जगदीश फुलपगारे, शाखा अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, माणगाव

या योजनेअंतर्गत देवळी, मूर, भिंताड, नागाव, वाक ी, हुर्डी, काचले, मढेगाव, नादवी पुरार, वनी, मलई, मलई कोंड, सोन्याची वाडी अशी अनेक गावे येतात.

Web Title: Water supply from 6 villages closed for the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.