रोहा-कोलाड रस्त्यालगत असलेल्या रोहा शहराला पाणीपुरवठा करणारी रोहा नगरपालिकेची जलवाहिनी भगवती स्वा मिलजवळ अचानक शनिवारी सायंकाळी फुटली. यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले असून, रोहा शहरात होणारा पुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र, यामुळे अनेकांना या समस्येला तोंड द्यावे लागले. तर पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्यामुळे दोन्ही बाजूची रहदारी बंद झाल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
रोहा-कोलाड रस्ता काही ठिकाणी उखडलेला असल्याचे पाहावयास मिळाले. मात्र, पाण्याचा प्रचंड प्रवाह असूनही काही अतिउत्साही दुचाकीस्वार या मार्गावरून मार्गक्रमण करीत असल्याचे पाहावयास मिळाले. रोहा-कोलाड रस्त्यालगत गेल्या कित्येक वर्षांपासूनचीअसलेली रोहे शहराला पुरवठा करणारी जलवाहिनी आहे. उच्चदाबाच्या या पाण्याच्या लाइनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ असल्यामुळे हे पाणी लगतच्या नाल्यात वाहत होते.
जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया जाऊन थेट कुंडलिका नदीला मिळाले. परिसरातील पाणीपुरवठा अचानक बंद झाल्यामुळे अनेकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. जलवाहिनी अचानक फु टल्याने कोलाडकडे जाणाऱ्या व रोह्याकडे येणाºया वाहनांच्या दोन्ही बाजूला रांगाच रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या. दरम्यान, ही जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे यापुढेही असाच त्रास होणार का? असाच प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.