पाणीपुरवठा योजनांना निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:44 AM2018-05-10T06:44:59+5:302018-05-10T06:44:59+5:30

पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे.

Water supply schemes Raigad News | पाणीपुरवठा योजनांना निधी मिळेना

पाणीपुरवठा योजनांना निधी मिळेना

Next

- मयूर तांबडे
पनवेल : पनवेल महापालिकेसह ग्रामीण परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यामधील १३ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. परंतु निधी मिळत नसल्याने या योजना रखडल्या आहेत. जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या या योजना पूर्ण करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
पनवेल तालुक्यात गिरवले, खैरवाडी, अकुळवाडी, गुळसुंदे, कोळखे, सोमटणे, पोसरी, नितळस, कर्नाळा, शिरढोण, नेवाळी, देवळोली, चिंध्रण या १३ गावांमध्ये लाखो रु पये खर्च करून राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजनेअंतर्गत पाण्याच्या टाक्या बांधण्यात येत आहेत. यातील नेवाळी, देवळोली, चिंध्रण, खैरवाडी, अकुळवाडी, सोमटणे, पोसरी येथील योजनांचे काम अर्धवट असून देखील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तर गिरवले, गुळसुंदे, कोळखे, नितळस, कर्नाळा, शिरढोण येथील पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.या १३ गावातील प्रत्येक योजनेला ४ ते५ वर्षांचा कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नळ पाणी योजनेचा उद्देश सफल होताना दिसत नाही. १३ गावातील योजनेसाठी अंदाजपत्रकीय ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रु पये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख ६४ हजार रु पये खर्च करण्यात आले आहेत. तर या योजना पूर्ण करण्यासाठी अद्यापही ५ कोटी ६८ लाख ५४ हजार रु पयांच्या निधीची आवश्यकता आहे.
पनवेल तालुक्याचे मोठ्याप्रमाणात शहरीकरण होवू लागले आहे. तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. अनेक गावांचा महापालिकेमध्ये समावेश झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावे नैना प्रकल्पाचा घटक झाली आहेत. भविष्यात देशातील सर्वाधिक गुंतवणूक पनवेल तालुक्यात होणार आहे. निवासी व औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. वर्तमान स्थितीमध्ये पाणी हीच सर्वात गंभीर समस्या आहे. भविष्यात ही स्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईमुक्त पनवेल तालुका करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. रखडलेल्या योजना वेगाने मार्गी लावण्यात याव्यात अशी मागणी होवू लागली आहे.

गावनिहाय पाणीपुरवठा योजनेचा तपशील

निधीअभावी पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. या कामांसाठी आवश्यक निधी मिळाला की कामे पूर्ववत सुरू करून पूर्ण केली जातील.
- आर. डी. चव्हाण,
उपअभियंता पाणीपुरवठा विभाग

च्१३ जलकुंभासाठी ८ कोटी ६६ लाख ८२ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून ३ कोटी १ लाख रुपये खर्च झाले असून कामे पूर्ण करण्यासाठी
५ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.

Web Title: Water supply schemes Raigad News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.